श्रीमती नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या या उपक्रमांचे चौहीदिशाने कौतुक. धनादेश घेताना रिक्षाचालकांचे परिवार भावुक.
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
देहुरोड दि. :- बेटी बचाव बेटी पढाओ चे प्रणेते व श्रीमती नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सामाजिक ऋण फेडत रिक्षा चालकांच्या मुलीच्या शिक्षणासाठी हातभार लावत प्रत्येकी पाच हजार रुपये चे धनादेश नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर अगरवाल हे राबवित असलेल्या आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून रिक्षा चालकांच्या मुलींच्या शिक्षणाला मद्दतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपत रिक्षा चालकांच्या मुलीना हातभार लावले. प्रेस मीडिया लाईव्ह वृत्त प्रतिनिधी यांनी भेट घेतले असता बेटी बचाव बेटी पढाओ चे प्रणेते श्रीमती नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर अगरवाल यांनी ॴॅटो रिक्षा चालक हे सामाजाचे एक घटक आहे अनेक रिक्षा चालक हे रिक्षा भाडेतत्त्वावर घेऊन आपले उदार निर्वाह करीत आहे शिफ्ट प्रमाणे रिक्षा भाडेतत्त्वावर चालवुन आपले प्रपंच चालवतात संपुर्ण दिवस रिक्षा चालवून कमविलेल्या पैशातुन मालकांना ठरल्याप्रमाणे पैसे देऊन उरलेल्या पैशातून संसाराचा गाडा हाकत आहे आज महागाईच्या काळात यांना आपले मुलाबाळांना शैक्षण देण्यासाठी खुपचं तारेवरची कसरत करावी लागत आहे मेहनत घेत असताना यांची आर्थिक दृष्ट्या दुर्बलता व परिस्थिती बघता यांना हातभार लावणे हे गरजेचे आहे कारण हे ही समाजाचे एक घटक आहेत असे द प्रेस मीडीया लाईव्ह वृत्त वाहीनीला माहीती देताना दिली तर हे धनादेश रफिक शेख,राजू सिंग, सलिम सय्यद, विजय जाधव, दयानंद गायकवाड,विजय माळगी, तुकाराम बागल, युसुफ शेख,किरण वाल्मिकी, यांच्या हस्ते १३ रिक्षा चालकांच्या मुलीना धनादेश देण्यात आले शैक्षणिक मदत मिळाल्याने रिक्षाचालकांचे परिवार ही भावुक होऊन देहुरोडच्या लाभार्थी रिक्षा चालकांनी श्रीमती नारायण देवी चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वर किसनलाल अगरवाल यांचे खुप खुप आभार मानले. अनेक वर्षापासुन राबवित असलेल्या उपक्रमाचे चौहीदिशाने कौतुक होत आहे .