कामगार नेते प्रभाकर कांबळे. (मुंबई भाडेकरू महासंघाचे प्रदेशाध्यक्ष)
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई : प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंमलबजावणी कालावधी सन 2024ते 2029 या कालावधीत मुंबई महानगरातील भाडेकरू तत्त्वावर राहणाऱ्या कुटुंबांना हक्काची घरे देणे बाबत प्रशासकिय यंत्रणेला आदेशित करा अशी मागणी मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदिश कुमार इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मुंबई प्रदेश अध्यक्ष व कामगार नेते प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वात गृह निर्माण विभागाकडे सुरु असून त्याची दखल घेवुन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यकारी अभियंता 2 प्रधानमंत्री आवास योजना/ प्राधिकरण गृह निर्माण भवन कला नगर बांद्रा पूर्व मुंबई कडून 5जा, क्रं/ एम, एच / मु अ 3/ का अ 3/ प्रआयो/ 382/ 2025/ 13/5/2025 रोजी पत्र देवून विक्रोळी भागातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे बाबत प्रकल्प अहवाल स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत अर्थात सहाय्यक आयुक्त बृहन्मुंबई भांडुप येथील सुकानू अभिकरनाकडे पाठविणे बाबत मुंबई भाडेकरू रहिवाशी महासंघ चे प्रदेश अध्यक्ष व कामगार नेते प्रभाकर कांबळे यांनी तहसील कार्यालय मुलुंड व बृहन्मुंबई महानगरपालिका भांडुप कार्यालय यांच्याकडे केली .
यावेळी संघाच्या मुंबई जिल्हाध्यक्ष वनिताताई कांबळे व सचिव सौ कविता निकाळजे यांनी तहसीलदार यांच्याशी चर्चा करताना सांगीतले की गृहनिर्माण मंत्री ना एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत परवडणाऱ्या घराची निर्मिती कारणासाठी घोषणा केलेली आहे त्याची दखल घेवुन स्थानिक स्वराज्य संस्था यांनी मुंबई भाडेकरू रहिवाशी महासंघ पाठपुरावा करीत असून त्याची दखल घ्यावी अशी मागणी केली .
तसेच भाड्याने राहणारे रमिला पांचाळ यांनी सांगितलं की माझ्या परिवारासाठी राहण्याकरिता पन्नास हजार डिपॉझिट प्रत्येक महिन्याला आठ हजार रुपये भाडे असे आम्ही बऱ्याच वर्षापासून राहतो परंतु प्रधानमंत्री यांच्या सर्वांसाठी घरे संकल्पनेतून आम्हाला परवडणाऱ्या घराच्या निर्मितीतून जर घर मिळाले तर बरे होईल असे सांगितले तसेच आशा नरेंद्र पांचाळ यांनी सुद्धा आपल्या ला भाड्याने राहण्याकरिता होणारा त्रास तहसील कार्यालयात व्यक्त केला त्यामुळे त्यांना सुद्धा हक्काच्या घराची गरज असल्याचे निवेदनात नमूद केले . असून अंगणवाडी सेविका मदतनीस माधुरी हेमंत यशवंते ह्या सुद्धा हक्काचं घर मिळावं यासाठी तहसील कार्यालयामध्ये निवेदन सादर करताना उपस्थित होत्या तसेच शारदा जयस्वार यांच्या पतीचे निधन झाल्यामुळे त्यांना राहण्यासाठी मुंबई महानगरात हक्काचे घर नाही म्हणून मोठ्या नाईलाज ने ते आपल्या आईच्या घरी राहतात असे अनेक कुटूंब मुंबई महानगरात राहतात परंतु त्यांना हक्काचे घर नाही म्हणून हक्काचं घर मिळावं याकरिता मुंबई रहिवासी भाडेकरू महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वात पुन्हा निवेदन सादर करून परवडणाऱ्या घराची निर्मिती करणे बाबत व हक्काचे घर मिळणे बाबत मुंबई महानगरात भाडेतत्त्वावर राहणाऱ्या लोकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी केली
तसेच मुंबई भाडेकरू रहिवासी महासंघाचे युवा नेते राजूभाऊ कासारे उपस्थित होते त्यांनी तहसीलदाराशी संवादसाधत असताना सांगितले की प्रधानमंत्री आवास योजना शहरी याची अंमलबजावणी कालावधीमध्ये प्रशासनाने संघटनात्मक पातळीवरती केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन पाठपुरावा करणे काळाची गरज आहे असे सांगितले यावेळी भाडेकरू महासंघाच्या महिला सभासद बहुसंख्येने उपस्थित होत्या . यावेळी मुंबई भाडेकरू महासंघाचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.