प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कणेरीवाडी येथील राकेश शंकर वाळकी (वय 22.रा.त्रिमुर्तीनगर ,गणपती मंदीरजवळ) याने रहात असलेल्या घरातील दुसऱ्या मजल्यावरील रुम मध्ये छताच्या लोखंडी पाईपला सुती दोरीने गळ्यास गळफास लावून घेतल्याने नातेवाईकांनी त्याच्या गळ्यातील गळफास सोडवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.हा प्रकार सोमवार (दि.05 मे ) रोजी दुपारी चारच्या सुमारास घडला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
राकेश हा अविवाहित असून त्याचे BSC.पर्यत शिक्षण झाले असून सध्या घरीच होता.त्याच्या पश्च्यात आई-वडील आणि भाऊ आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
----------------------------------------
उपचारासाठी आलेल्या वृध्देचा मृत्यु.
कोल्हापूर - सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या शंकुतला मधुकर पोवार (वय 77.रा.दत्ता मिसाळ गल्ली,राजेंद्रनगर ,को.) या आपल्या नातेवाईकासमवेत सीपीआर रुग्णालयात आल्या होत्या. त्यांची अचानक तब्ब्येत बिघडल्याने त्यांच्यावर उपचार चालू असताना मृत्यु झाला.हा प्रकार सोमवार (दि.05 मे ) रोजी दुपारच्या सुमारास घडला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
-------------------------------------
कदमवाडी येथे तरुणाची आत्महत्या.
कोल्हापूर - कदमवाडी परिसरातील सह्याद्री हौसिंग सोसायटी येथील राजेंद्र चंद्रकांत पोवार (वय 24) याने रहात असलेल्या घरातील छताच्या लोखंडी पाईपला साडीने गळ्या भोवती साडीने गळफास लावून घेतल्याने नातेवाईकांनी त्याच्या गळ्यातील गळफास सोडवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.हा प्रकार सोमवार (दि.05 मे ) रोजी पहाटे साडे पाचच्या सुमारास घडला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.