इचलकरंजी महानगरपालिकेच्या जी.एस. टी. परतावा यासह शहरी विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध प्रश्नी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस साहेब सकारात्मक - आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील

 


    


प्रेस मीडिया लाईव्ह :

  इचलकरंजी :    दि १५ मे आणि दि.१६ मे २०२५ रोजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद संचालनालय, महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेचे आयुक्त, सर्व विभागीय सह आयुक्त, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, सर्व जिल्हा प्रशासन अधिकारी,अ वर्ग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, महानगरपालिकेचे शहर अभियंता यांच्या दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन यशदा पुणे येथे करणेत आलेले आहे.

    या ठिकाणी मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समवेत झालेल्या बैठकीत आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी इचलकरंजी महानगरपालिकेचा प्रलंबित असलेला जी.एस.टी.परतावा, पाणी पुरवठा योजना, केंद्र आणि राज्य सरकारच्या, रस्ते विकास यासह शहरी विकासाच्या विविध योजनांमधील महानगर पालिकेचा हिस्सा कमी करणे बाबतची मागणी केली.

   सदर मागणीसचे अनुषंगाने  मा. मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे  हि बाब महानगरपालिकेच्या भविष्यातील कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.


       

Post a Comment

Previous Post Next Post