प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी दि . स्वराज्य क्रांती कामगार सेनेच्या माध्यमातून स्थलांतरित परप्रांतीय कामगार , असंघटीत क्षेत्रातील कामगार . बांधकाम कामगार , खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील स्वच्छता कामगार , खाजगी औदयोगिक क्षेत्रातील महिला कामगार , घरेलू महिला कामगार , वस्त्रोद्योगातील महिला कामगार यांचे आरोग्य व सुरक्षा अबादीत ठेवण्या साठी व त्यांच्या न्याय हक्क व अधिकार , किमान वेतन , मुलभुत प्रश्न व हक्कांचा घरकुलाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटीत पणे प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन पँथर आर्मीचे संस्थापक प्रमुख संतोष एस आठवले यांनी केले .
पँथर आर्मी प्रणित स्वराज्य क्रांती कामगार सेनेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन रुई फाटा कोल्हापुर रोड (ता हातकणंगले) उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले .
यावेळी राष्ट्रीय कार्यकारी प्रमुख समिर विजापुरे कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र रुईकर , जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे, जिल्हा महासचिव नितेश कुमार दिक्षांत , हातकणंगले तालुका अध्यक्ष अशगर पेंढारी , राजू मोमीन , सलिम माणगांवे , संतोष करात , भैय्यासाहेब धनवडे , भिकाजी आपुगडे , बाळु कराळे , पत्रकार शितल कांबळे , कॅप्युटर ऑपरेटर संकपाळ मॅडम उपस्थित होते . स्वागत व प्रास्ताविक मच्छिंद्र रुईकर यांनी केले तर आभार नितेश कमार दिक्षांत यांनी मानले