स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आले.
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती( दिल्ली )यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा सांगली रोड दत्त कॉलनी, रेंदाळकर मळा इचलकरंजी येथे संपन्न झाला या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. रवींद्र माने शिवसेना जिल्हाप्रमुख ( शिंदे गट ) सद्गुरू, किशोरनंद महाराज, सद्गुरू. आदिनाथ महाराज, ह.भ.प. तात्या महाराज. मा. श्री. मारुती सावंत.( मराठवाडा )डॉ. शेख निसार इसाक .(मंगळवेढा) मा. श्री .अमित पाटील (विदर्भ )अँड संतोष हापसे (मुंबई हायकोर्ट वकील) मा. श्री.दिनकर पतंगे मा. श्री बाबासाहेब सावंत( क्रांतीसुर्य सामाजिक संघटना अध्यक्ष) डॉ. विजय चांदणे (समतावादी महासंघ अध्यक) शितल ताई (वसगडे) नानिता वाणी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना रवींद्र माने म्हणाले समाजाचे आपुलकीने काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला पुढे आणण्याचे काम स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेल्फेअर समिती ब दत्ता मांजरे पुरस्कार देऊन सन्मान करीत आहेत तसेच पुरस्कार विजेत्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री.दत्ता मांजरे( तारदाळकर ) व समितीचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले .
यावेळी मोठ्या प्रमाणात पुरस्कर्त्यांचे नातेवाईक व स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समितीचे दत्तात्रय गोडबोले , हेमंत जावीर , बबलू गावडे, छाया पाटील, महादेव पाटील, प्रिया जमादार ,मीना कोळी ,दयानंद जावीर, नाना दादार ,दगडू कांबळे, अजय पाटील, दिनकर पतंगे, सुनील कांबळे,अजय पाटील व पदाधिकारी उपस्थित होते