प्रेस मीडिया लाईव्ह :
अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे
कोल्हापूर: महाराष्ट्र दिनी दिनांक १ मे २०२५ रोजी रोटरी क्लब हॉल, कोल्हापूर येथे "साहित्य संमेलन व राष्ट्रीय संवाद परिषद 2025" यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यभरातील निवडक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमांचे उद्घाटन डॉ. व्ही एन शिंदे, प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस, प्राध्यापक किसनराव कुराडे, श्री शिवाजी रोडे पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी -विजय जोशी मुंबई, प्रभाकर कुलकर्णी नाशिक, होते
या कार्यक्रमात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित सातवे हायस्कूल, सातवे व गर्ल्स हायस्कूल, सातवेचे सहशिक्षक मा. श्री. संजय पद्माकर पोतदार यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तसेच सातवे हायस्कूल, सातवेचे शिक्षक श्री. प्रविण दत्तात्रय बरकाळे यांना ही त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी कमलाकर वटेंकर साहित्य परिषद कोल्हापूर, डॉ. व्ही एन शिंदे, प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस, प्राध्यापक किसनराव कुराडे, श्री शिवाजी रोडे पाटील, विजय जोशी मुंबई, प्रभाकर कुलकर्णी नाशिक, बबन पोतदार उपस्थित होते..