प्रेस मीडिया लाईव्ह :
दत्तवाड : श्रीमती आक्काताई नेजे हायस्कुल ( ता . शिरोळ )येथील सन 1991 - 92 या वर्षाच्या दहावी बॅचच्या माजी विध्यार्थी विद्यार्थीनी चा स्नेह मेळावा गेट टुगेदर ( GT ) रविवार दिनांक 25 मे रोजी शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती माजी विद्यार्थी चंद्रशेखर कलगी यांनी दिली आहे .
बसगोंडा पाटील , देवेंद्र चौगुले, शंकर कुंभार , राजू पाटील , युनुस कुरणे सचिन सिदनाळे . सुदर्शन पाटील, पुष्पा मगदूम , मेघना उपाध्ये , बाहुबली कमते, बाहुबली नेजे , श्रीकांत माने यांच्या सोबत दत्तवाड गावातील व परिसरातील सर्व माजी विद्यार्थी / विद्यार्थीनी यांनी पुढाकार घेऊन स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत .
25 मे रोजी सकाळी 8.00 वाजल्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . या मध्ये सर्व माजी विद्यार्थी / विद्यार्थीनी चा परिचय त्यांचे मनोगत व आदर्श गुरुजनांचा विशेष सत्कार , सांस्कृतीक कार्यक्रम , स्नेह भोजन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे .
या स्नेह मेळाव्याचे खास निमंत्रण शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक प्राचार्य , निवृत अध्यापिका बरगाले मॅडम , वनकोरे मॅडम . नाना अंबुपे सर यांना देण्यात आले आहे . तसेच 1992 बॅच ला शिकवणाऱ्या सर्व निवृत्त अध्यापकांना निमंत्रण देण्यात येणार आहे .
या स्नेह मेळ्यात सन 1991/92 चे सर्व माजी विद्यार्थी / विद्यार्थीनी , इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत चे सर्व विद्यार्थी यांनी सहभाग घ्यावा व परत एक दिवसाची शाळेचा अनुभव व निखळ मैत्री च्या आठवणीं आणि पुन्हा बाल वयात रममान होण्याचा आनंद घ्यावा असे अवाहन दत्तवाड व परिसरातील माजी विद्यार्थी यांनी केले आहे