भारताने आक्रमक भूमिका घेतल्याने मंत्र्यांनी केली भीती व्यक्त
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
पुणे दि . :- पहलगाम हल्ल्या प्रकरणी पाकिस्तानची झोप उडाली आहे पाक मंत्र्यांनी रात्री २:०० वाजता पत्रकार परिषद घेत पाकच्या मंत्र्यांने भारताकडून लष्करी करावाई होण्याची भीती व्यक्त केली आहे. तर अनेक पाक नेते हे पोकळ धमकीचे बम फोडत आहेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे.
अशातच काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लष्कराच्या तीनही दलांच्या प्रमुखांसह तसंच निमलष्करी दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महत्त्वपूर्ण बैठक घेतली. मोदींच्या या बैठकीनंतर पाकिस्तानची झोप उडाल्याचे दिसत आहे. रात्री २:०० वाजता पत्रकार परिषद घेत पाकच्या मंत्र्यांने भारताकडून लष्करी करावाई होण्याची भीती व्यक्त केली आहे.
पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्तातुल्लाह तरार यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ''पुढच्या २४ ते ३६ तासांत भारताकडून पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करणार असल्याची आमच्याकडे विश्वसनीय माहिती आहे. पहलगाममधील घटनेत पाकिस्तानचा निराधार संबंध जोडून हा हल्ला करण्याचा विचार भारताकडून केला जात आहे.'' अशी भीती व्यक्त केली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना ठेचा, बदला घ्या, पाकिस्तानची कायमची अद्दल घडवा अशी मागणी देशातून होत आहे. घेण्यात आलेल्या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी दहशतवाद चिरडून टाकण्यासाठी कधी, कुठे आणि केव्हा लष्करी कारवाई करायची, याचे संपूर्ण स्वातंत्र्य संरक्षण दलांना दिल्याच समजते. मोदींच्या या निर्णयानंतर रात्री २:०० वाजता पाकिस्तानच्या मंत्र्याने पत्रकार परिषेद घेतली.
पाकच्या मंत्र्यांला भिती..
भारत पहलगाम हल्ल्याच्या बहाण्यानं पुढील २४ ते ३६ तासांत पाकिस्तानवर भारतीय सैन्य हल्ला करू शकते. आम्ही कुठल्याही हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देऊ, असं मंत्री अत्ताउल्लाह म्हणाला.
तसेच, पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी आहे. त्यामुळे हे संकट आम्हाला समजते. आम्ही याचा कायम निषेध केला आहे. पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी तज्ज्ञांच्या टीमद्वारे पारदर्शी चौकशी करण्यास आम्ही तयार आहोत असं सांगत मंत्री तरार यांनी जागतिक पातळीवर या स्थितीचं गांभीर्य ओळखून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
पाकिस्तान कुठल्याही किंमतीत आमच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहे असंही पाकिस्तानी मंत्री अत्ताउल्लाहा तरारने म्हटलं आहे.