प्रेस मीडिया लाईव्ह :
शिरोळ : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे काल सकाळी दर्शनासाठी आलेल्या बेळगाव जिल्ह्यातील आंबेवाडी येथील कुटुंबातील दोन मुले कृष्णा नदीत पडली होती. हे कुटुंब श्री दत्त मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शनापूर्वी कृष्णा नदीच्या पाण्यात उतरून हातपाय धुवत असताना या मुलांचा पाय घसरला आणि ते पाण्यात बुडू लागले. त्यांच्यासोबत असलेल्या एका मुलाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी, वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान तिथे उपस्थित होते. त्यांनी तत्काळ नदीत उडी मारून दोन्ही मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले. या मुलांची नावे प्रेम आणि गणेश होती.