गाव भंडाराने जोतिबा चैत्र यात्रेची सांगता.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे "जोतिबाच्या नावाने चागभलं "च्या गजरात जोतिबा मंदीर परिसरात गाव भंडारा आणि विविध धार्मिक कार्यक्रमानी जोतिबा यात्रेची सांगता झाली. मंगळवार (29 ) रोजी सकाळ पासून गाव भंडाराच्या निमित्ताने मंदीरात सकाळ पासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. जोतिबाच्या नावाने चागभलंच्या    गजरात मंदीर परिसर भक्तीमय झाला.काही भाविकांची मनोकामना पूर्ण झाल्याने केलेला नवस पूर्ण करण्याचे धार्मिक विधी पूर्ण केले.पहाटे चार वाजता धार्मिक विधीला सुरुवात झाली.सकाळी पाद्यपूजा मुखमार्जन,काकड आरती आणि त्या नंतर" श्री"अभिषेक घालण्यात आला.या वेळी केदार सहस्त्रनाम ,केदारकवच याचे वाचन करण्यात आले.त्या नंतर "श्री"ची राजेशाही थाटातील अंलकारिक महापूजा बांधण्यात आली.

दुपारी एकच्या सुमारास नैवेद्य मिरविणूकीने यमाई मंदिराकडे जाऊन परत जोतिबा मंदिरात परत आल्यानंतर आरती करून भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

या वेळी "श्री"चे मुख्य पुजारी,गावकर ,देवस्थानचे धैर्यशील तिवले ,सिंधीया ट्रस्टचे अजित झुगर यांच्यासह सर्व देवसेवक ,पुजारी ,ग्रामस्थ उपस्थित होते.या गुढ़ी पाडव्या दिवशी गावातील मंडळांनी मंदीरात सासनकाठ्या उभ्या केल्या होत्या त्याची गाव भंडाराच्या आणि चैत्र यात्रेच्या सांगता सोहळ्याचे औचित्य साधून पारंपारिक वाद्यासह मिरवणूक काढण्यात आली.या वेळी ग्रामस्थांनी आणि भाविकांनी सासनकाठ्यावर गुलाल खोबरे उधळण्यात आले.रात्री उशिरापर्यंत  मंदीर आवारात महाप्रसादाचे वाटप चालू होते.

जूनचा पहिला रविवार हा सरता रविवार म्हणून साजरा केला जातो.या दिवशी प्रत्येक गावकरी आपआपल्या घरी गोड पदार्थ तयार करून " श्री "नैवेद्य दाखविला जातो.या दिवशी शेवटचा पालखी सोहळा साजरा केला जातो.या वेळी संपूर्ण गाव या सोहळ्यासाठी मंदिरात येतो.

Post a Comment

Previous Post Next Post