प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - वारणानगर येथे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा असून या बँकेत 3 कोटी पेक्षा जास्त रक्कमेचा अपहार केल्या प्रकरणी या बँकेतील शाखाधिकारी,क्लार्क, रोखपाल यांच्यासह पाच जणांच्या विरोधात कोल्हापूर शाखेचे उपव्यवस्थापक बाळासो बेलवलेकर (रा.कुरुकली) यांनी कोडोली पोलिस फिर्याद दिली. कोडोली पोलिसांनी वारणा शाखेचे शाखाधिकारी तानाजी ईश्वरा पोवार (रा.कळे), क्लार्क मुकेश विलास पाटील (रा.मसूदमाले), रोखपाल शिवाजी शहाजी पाटील (रा.आरळे) ,मिनाक्षी भगवान कांबळे (रा.कोडोली) व शरीफ मुंताज मुल्ला (रा.कोडोली) या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी शाखाधिकारी वगळता एका महिलेसह चौघांना अटक केली आहे.
यांनी संगनमताने धनादेश आणि पे स्लिपवरती खोट्या सह्या करून काही खातेदारांची खोटी खाते उघडून 3 कोटी 20 लाख रुपयांचा अपहार केल्याचे प्रकरण उघडकीस आले.हा प्रकार जुलै 2021 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत घडला आहे.सदर खातेदारांची खोटी खाते या ब्यँकेच्या शाखेत उघडून सदर खातेदारांचा वापरत असलेला पासवर्ड ,युजर्स कोडचा वापर करून त्याच प्रमाणे त्यांच्या आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे,केवायसी तपासणी दरम्यान त्या खातेदारांनी या पाच जणांकडे मागणी करुन सुध्दा न देता 3 कोटी 20 लाखां पेक्षा जास्त रक्कमेचा अपहार करून बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने त्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.यातील शाखाधिकारी गायब झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेच्या सुवर्णा पत्की,कोडोली पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक कोडग हे पुढ़ील तपास करीत आहेत.