नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर अगरवाल दिल्ली रत्न पुरस्काराने सन्मानित.

  पुरस्कार मिळाल्याने अनेक सामाजिक संस्था संघटनेच्या वतीने शुभेचेचे वर्षाव .            



प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे : 

 देहूरोड दि. नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर अगरवाल यांना भारत मंच संस्थेच्या वतीने दिल्ली रत्न पुरस्कार त्यांना नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात प्रदान करण्यात आला. भारत मंच च्या ११व्या दिल्ली रत्न पुरस्कार भारताचे माजी न्यायमूर्ती के जी बालकृष्णन व दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते देण्यात आला.                           

 हा पुरस्कार ईश्वर अगरवाल यांना नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या उपक्रम राबवुन मागील २५ वर्षांपासून सामाजिक कार्य करत आहेत तसेच त्यांनी बेटी बचाव बेटी पढाओ या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक मुलींच्या नावे ५००० रूपये देऊन तसेच आर्थिक मदत करून मुलीच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याचा काम नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करीत आहेत तसेच महापुरुषांच्या जयंती साजरा करत देणगी अन्नदान करून अनेक सामाजिक संघटनांना मदत करत आहेत असे उल्लेखनीय कामगिरी करत असल्याने त्यांना विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आता पर्यंत ३५० विविध सन्मान चिन्हाने सन्मानित करण्यात आले आहे या उल्लेखनीय कार्याची दखल घेत नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर अगरवाल यांना भारत मंच च्या वतीने दिल्ली रत्न पुरस्कार प्रदान केल्याचे त्यांनी द प्रेस मीडीया लाईव्ह चे प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे यांना सांगितले पुरस्कार मिळाल्याने अनेक स्तरावरून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे भारतीय संविधान सन्मान संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ रामदास ताटे यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व समन्वयक व पदाधिकारी यांच्या वतीने ईश्वर अगरवाल यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post