प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - प्रेस मीडिया लाईव्हच्या 5 व्या वर्धापन दिना निमित्त पुरस्कार वितरण सोहळा शाहु स्मारक भवन येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व पुरस्कार सोहळा मंगळवार दि.22 एप्रिल 2025 रोजी मान्यंवरांच्या उपस्थित पार पडला.
या सोहळ्यात कोल्हापुर येथील सिध्दार्थनगरातील सामाजिक कार्यकर्ते श्री.करण राजाराम भोसले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन "राष्ट्रीय समाजभूषण "हा पुरस्कार मराठा महासंघाचे अध्यक्ष श्री.वसंतराव मुळीक (नाना) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या वेळी प्रेस मिडिया लाईव्हचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान अँड श्री.अयुब शेख, बापूसाहेब कांबळे, फिरोज मुल्ला सर , महम्मद रफिकमांगुरे सर , मराठी चित्रपट अभिनेत्री पद्मजा खटावकर ,कादरभाई मलबारी,प्रबोधीनी माने,सौ.पाटील,श्रीकांत कांबळे आणि कोल्हापूर प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह इतर मान्यंवर आणि पुरस्कार प्राप्त पुरस्कारकर्ते आपल्या नातेवाईकांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.