'
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
पुणे : काश्मीर येथील पहलगाम हल्यात दहशतवाद्यांनी २८ निरापराध लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला यांचे पडसाद देशभर उमटले असता खराडी चंदननगर येथे भारतीय जनता युवा मोर्चा (महाराष्ट्र प्रदेश) च्या वतीने भव्य मशाल मोर्चा व तीव्र निषेध आंदोलन करण्यात आला,
यावेळी 'सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्थान' अशा घोषणा देत खराडी चंदननगर मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा (महाराष्ट्र प्रदेश) च्या वतीने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भव्य मशाल मोर्चा तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. पहलगाम हल्ल्या प्रकरणी हातात बैनर घेऊन मिट्टी में मिलाने का समय आ गया है, जागो हिंदुस्थान जागो, हिशोब होणार प्रत्येक अश्रूचा आणि गोळीचा, दहशतवाद्यांना खत पाणी घालणाऱ्यांनो भारत तुम्हाला सोडणार नाही, असे बैनर हातात घेऊन मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे आयोजन भाजपा युवा मोर्चाच्या चे उपाध्यक्ष नवनाथ पठारे( महाराष्ट्र प्रदेश) यांनी केले या वेळी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मशाल हाती घेऊन हे मोर्चा खराडी येथे काढण्यात आला या वेळी पाकिस्तानच्या विरोधात सुनले बेटा पाकिस्तान बाप है तेरा हिंदुस्थान, मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद असे म्हणत पाकिस्तानचे झेंड्याची होळी करून जाळण्यात आले तर रस्त्यावर पाकीस्तानातचे झेंडे पायाखाली तुडवून जोरदार घोषणाबाजी करत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आले या मशाल मोर्च्या मध्ये शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.