वीरशैव लिंगायत समाजातर्फे अक्षय तृतीयेस शिव-बसव जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार... अशोक स्वामी अध्यक्ष

विरशैव उत्कर्ष आणि लिंगायत समाज मंडळ (नियोजित)

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी दि .३०/०४/२०२५अक्षय तृतीया दिवशी इचलकरंजी येथील महानगरपालिकेच्या मालकीच्या महात्मा बसवेश्वर बहुद्देशीय सभागृह व उद्यान सांगली रोड, सांगली नाका इचलकरंजी येथे छत्रपती शिवाजी महाराज व वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.

दि. ३०/०४/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजाती मधील बंधू-भगिर्नीच्या वतीने महात्मा बसवेश्वर बहुद्देशीय सभागृह व उद्यान, जय सांगली नाका इचलकरंजी येथे शिव-बसव प्रतीमा पुजन करण्यात येणार आहे. यावेळी जन्मोत्सव, सुंठवडा वाटव व खीर प्रसाद वाटप व वीरशैव लिंगायत समाजातील महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभही आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी अनेक वक्ते शिव-वसव यांचे गुणगान करणार आहेत.

या कार्यक्रमासाठी खासदार धैर्यशिल दादा माने, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक सौ. पल्लवी पाटील, माजी नगराध्यक्षा सौ. अँड अलका स्वामी, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने, सामाजिक कार्यकर्त्या सौ. स्मिता तेलनाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मदनराव कारंडे, नगरसेवक प्रकाश पाटील, उदय पाटील, सौ. शुभांगी माळी इ. मान्यवरांना निमंत्रीत करण्यात आले आहे.

याचवेळी महात्मा बसवेश्वर बहुद्देशीय सभागृह व उद्यानाचे प्रवेशद्वारावरील नामकरणाचे उ‌द्घाटन करण्यात येणार आहे. तरी या समारंभास इचलकरंजी परिसरातील वीरशैव लिंगायत समाजातील बंधु-भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे आवाहन समस्त विरशैव लिंगायत समाज व नियोजीत वीरशैव उत्कर्ष मंडळ, इचलंकरजी यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post