जंगली महाराज रोड (पुणे) मालिका बॉम्बस्फोट २०१२.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे जंगली महाराज ब्लास्ट 2012 मध्ये अटक केलेल्या फिरोज सय्यद पुणे कॅम्प येथील प्रसिद्ध (ऑप्शन टेलर) 13 वर्ष तुरुंगात अंडरट्रायल असताना गंभीर आजारामुळे पवित्र रमजानच्या महिन्यात त्याचा दिनांक 07/04/2024 रोजी मुंबई जेजे हॉस्पिटल मध्ये निधन झाले.

 तू आरोपी आहे की बेगुनाह हे कोर्टातून सिद्ध होणे खूप गरजेचा होता. तुला अटक केल्यानंतर दोन समाजामध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाची ती बातम्या आज ही माझ्याजवळ आहे. "हर मुसलमान दहशतवादी नही होता. पकडा गया हर दहशतवादी मुसलमान क्यू होता?" 13 वर्षे तुरुंगात तुला काय काय यातना सोसावे लागले तू आणि तुझ्या परिवारालाच माहित आहे.

        1 ऑगस्ट 2012 रोजी पुणे जंगली महाराज येथे सिरीयल बॉम्बस्फोट झाला. तो दिवस पवित्र रमजानचा उपवासाचा महिना होता व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती होती. मा. सुशील कुमार शिंदे भारताचे गृहमंत्री झाल्यानंतर पहिलाच दौरा पुण्यात होता. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी सुशील कुमार शिंदे पुण्यात येणार होते मात्र बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पुणे एअरपोर्टवरून ते परत निघून गेले.

         या बॉम्बस्फोटाचा महाराष्ट्र एटीएस योग्य दिशेने तपास करीत होते अचानक दिल्ली स्पेशल सेल तपास यंत्रणा पुण्यात आली व सांगितले की पुणे जंगली महाराज बॉम्बस्फोटाचा आम्ही छडा लावला आहे. असे बोलत काही तरुणांना त्यांनी अटक केली त्यात फिरोज सय्यद यांनाही अटक करण्यात आली होती. महाराष्ट्र एटीएस व दिल्ली स्पेशल सेल मधील वाद चव्हाट्यावर आले होते त्याबाबत अनेक वृत्तपत्राने प्रश्न उपस्थित केली होती.

या निरपराध तरुण मुलांच्या अटक विरोधात मी आणि माझे सहकारी मित्र यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन "दिल्ली स्पेशल सेल का खोकला सच" या पुस्तकाचा हवाला देत आज पर्यंत दिल्ली स्पेशल सेलने कशा पद्धतीने खोटे केसेस करून निरपराध मुस्लिमांना अटक करून त्यांचा आयुष्य बरबाद केल्याची माहिती दिली होती. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांना वर्षा बंगल्यावर भेट घेऊन या खोट्या कारवाईच्या विरोधात तक्रार केली मात्र याबाबत कोणीही आमच्या तक्रारीची दखल घेतली नाही.

*शेवटी ते म्हण खूप प्रसिद्ध आहे मुछ वालो को छोडो और दाढीवाले को पकडो.* पुणे जंगली महाराज ब्लास्ट केस मध्येही असेच काहीतरी खोटी व चुकीची कारवाई तपास यंत्रांच्या माध्यमातून केली गेली असल्याचे महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक एस. एम. मुश्रीफ यांची पुस्तक *बॉम्बस्फोट : ब्राह्मण्यवादी दोषी, मुस्लिमांना फाशी* वाचल्यानंतर समोर येत आहे. सदरची पुस्तक ॲमेझॉन वर उपलब्ध आहे

""""""""""""""""""""""""""""""""""""""""

जंगली महाराज रोड (पुणे) मालिका बॉम्बस्फोट २०१२.

        दिनांक १ ऑगस्ट २०१२ रोजी पुण्यात जंगली महाराज रोड येथे साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यात दयानंद भाऊराव पाटील (वय ३४) हा जखमी झाला. बॅगेत बॉम्ब वाहून नेत असताना बालगंर्धव चौकात बॉम्बस्फोट झाला. दयानंद भाऊराव पाटील कर्नाटकातल्या बीदर गावचा रहिवाशी असून २००९ साली तो पुण्यात आला. पुण्यापासून वीस किलोमीटर अंतरावरील उरुळी कांचन येथे तो राहायचा. गेल्या अडीच वर्षांपासून तो फर्ग्युसन कॉलेजजवळील शिरोळे रोडवरील नम्रता ड्राय क्लिनर्स या दुकानामध्ये काम करत होता. हे दुकान 'पतित पावन संघटना' या हिंसक कट्टरवादी संघटनेचे सदस्य असलेल्या शिवाजी चव्हाण यांच्या मालकीचे होते. दयानंद पाटीलच्या मते घटना घडली त्यादिवशी सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी दुकान बंद करून तो पुणे महानगरपालिकेच्या जवळील बस स्थानकाकडे पायी चालत जात होता, बालगंधर्व चौकातून जात असताना त्याने पाहिले की, अण्णा हजारे यांच्या 'इंडिया अर्गेन्स्ट करप्शन'शी (IAC) संबंधीत पाचशे लोक तेथे जमले होते. तिथे तो गेला. भाषणं ऐकत असताना त्याने त्यांची जेवणाच्या डब्याची पिशवी जवळच्या भिंतीजवळ ठेवली. त्याने पाच ते सात मिनिटे भाषण ऐकले आणि तिथून निघण्याचा निर्णय घेतला. बॉम्बस्फोट आणि त्यांची जेवणाच्या डब्याची पिशवी यासंबंधी त्याने वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कथा सांगितल्या. एका कथानकानुसार कोणीतरी त्याच्या डब्याच्या पिशवीत बॉम्ब ठेवला. दुसऱ्या कथानकात त्याने सांगितले की, डबा असलेल्या त्याच्या पिशवी ऐवजी त्याने दुसरीच पिशवी उचचली. तिसऱ्या कथानकानुसार त्याने त्याच्या कापडी पिशवीसोबत दुसरी एक प्लॅस्टीक पिशवी उचलली. नंतर त्याला जाणवले की, आपण उचललेली पिशवी आपल्या पिशवीपेक्षा जड आहे. आत काय आहे. हे पाहण्यासाठी त्याने पिशवी उघडली असता त्यांचा स्फोट झाला. वगैरे."

        पिशवी उघडून बघताना बॉम्बस्फोट झाला असता तर त्यांचा चेहरा ओळखूच आला नसता. पण त्या घटनेनंतर वार्ताहरांनी घेतलेले त्यांचे फोटो अनेक वर्तमानपत्रात छापून आले होते. त्या फोटोत त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. चेहऱ्यावर जखमेचे किंवा रक्ताचे डाग दिसत नाहीत आणि ससून जनरल हॉस्पिटल पुणे येथे त्याच्यावर उपचार सुरू असताना तिथल्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याच्या पोटाजवळ खालच्या भागावर जखम झालेली आहे व हनुवटी आणि डाव्या भूवईच्या वर थोडीशी जखम आहे. जखमांच्या स्थितीवरून असं दिसतं की, तो बॉम्बची पिशवी घेऊन जात असताना बॉम्ब फुटला असावा व त्यातील धातूच्या तुकडयांमुळे त्यांचे पोट, हनुवटी व भूवई येथे जखमा झाल्या.

        दयानंद पाटीलच्या जबाबात इतर अनेक विसंगती आहेत, पण पोलिसांनी त्याला अट्ठेचाळीस तासात निर्दोष मुक्तता दिली. इतर अनेक बॉम्बस्फोटांत ब्राह्मण्यवादी संशयितांना जागेवर पकडले असताना ज्या प्रकारे निर्दोष सोडले तसे या खटल्याही घडले. आश्चर्याची गोष्ट अशी की त्याला किरकोळ जखम असताना त्याला हॉस्पिटलमध्ये सात दिवसापेक्षा जास्त दिवस कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवले होते. हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये त्याला शस्त्रधारी पोलीस संरक्षणाला दिले होते. त्याला ठेवलेल्या वॉर्डमध्ये इतरांना जायला आणि डोकवायलाही बंदी होती. दोन पोलीस वाहने हॉस्पिटलच्या आवारात ठेवली होती. हॉस्पिटल सूत्रांना वार्ताहरांनी विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, त्याला कधीही घरी सोडू (Discharge) शकतात. पण पोलीस खात्याच्या निर्देशावरून त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेले आहे." या माहितीमुळे स्वाभाविकच पोलीस काहीतरी लपवायचा प्रयत्न करीत आहेत अशी कुजबुज सुरू झाली.

        अनेक महिने दयानंद पाटील आणि त्याच्या कुटुंबाविषयी काहीही ऐकण्यात आले नाही. तो पुण्यात नव्हता, उरुळी कांचनमध्ये ही नव्हता व त्याच्या जन्मगावी बीदरलाही नव्हता. पोलीसही त्याच्या ठिकाणाविषयी माहिती देऊ शकले नाहीत. अचानक मे २०१३ मध्ये म्हणजे तब्बल दहा महिन्यानंतर दयानंद पाटीलचं नाव वर्तमानपत्रात झळकले. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) या खटल्याचे आरोपपत्र दाखल केले होते व त्यात त्यांचा साक्षीदार म्हणून उल्लेख होता. त्याने स्फोटकांची पिशवी अजाणतेपणे उचलली असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले होते. वर्तमानपत्रातल्या बातमीत म्हटले होते की दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाच्या माहितीवरून कट उघडकीस आला असून त्यांत आठ लोकांना अटक केली आहे. त्यांची नावे अशी. १. इम्रान खान, २. बाजीद पठाण (नांदेड), ३. इरफान लांगडे, ४. अस्लम शेख उर्फ बंटी जहागीरदार (अहमदनगर), ५. असाद खान, सय्यद आरीफ उर्फ कासीफ सय्यद जफरूद्दीन बियाबानी (औरंगाबाद), ६. फिरोज उर्फ हमजा अब्दुल हमीद सय्यद, ७. मुबीन मेमन आणि ८. फारूक बागवान (पुणे) अहवालामध्ये पुढे म्हटले होते की, इंडियन मुजाहिदीनचे सदस्य रियाज भटकळ आणि इकबाल भटकळ, त्यांचे सहकारी शाकीर उर्फ असदुल्लाह अख्तर, अहमद उर्फ वाकास आणि लष्कर-ए-तैयबाचा समर्थक फयाज कागझी हे या खटल्यात पोलिसांना हवे (Wanted) होते. 

        ज्या मुस्लीम तरुणांविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले आहे त्यांच्या विरुद्ध नेहमीप्रमाणे फक्त त्यांचे कबुलीजबाब व जप्ती पंचनामे इतकाच पुरावा आहे; कोणताही शास्त्रीय किंवा विश्वासार्ह पुरावा नाही. वास्तविक शास्त्रीय पुरावा उपलब्ध होता, पण तो जाणीवपूर्वक नोंदवून घेतला नाही. ज्या जंगली महाराज रस्त्यावर हे बॉम्बस्फोट झाले ते पुण्याचे महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे व त्या रस्त्यावर जेथे जेथे बॉम्बस्फोट झाले. त्याच्या जवळपास शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तपासाच्या दरम्यान पोलिसांना ज्यात गुन्ह्याच्या वेळी संशयित व्यक्तींच्या हालचाली दिसत होत्या, असे कित्येक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण ताब्यात घेतले होते. (टाइम्स ऑफ इंडिया, पुणे ७ व ८ ऑगस्ट २०१२ व पुणे मिरर, दिनांक ८ ऑगस्ट २०१२) पण त्यातील एकही चित्रण त्यांनी पुरावा म्हणून न्यायालयासमोर आणला नाही. कारण स्पष्ट आहे. ज्यांना पोलिसांनी अटक केली आहे ते त्या सीसीटीव्ही चित्रणात कुठेच दिसले नसते. कारण ते खरे गुन्हेगारच नाहीत. पण या खटल्याचा तपास गुप्तचर संघटनेच्या (IB) लाडक्या दिल्ली विशेष पथकाने आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) केला असल्यामुळे या खटल्याच्या सत्यतेबद्दल कोणीही शंका उपस्थित करू शकत नाही, अगदी न्यायालयसुद्धा नाही. अटकेत असलेली मुस्लीम मुले आठ-दहा वर्षे तुरुंगात खितपत पडतील व त्यांनंतर कदाचित अक्षरधाम हल्यातील आरोपी प्रमाणे यांनाही सर्वोच्च न्यायालय निर्दोष सोडून देईल. पण खरा गुन्हेगार दयानंद पाटील याचे काय? आणि त्याच्या सूत्रधारांचे काय ? त्यांना कोण पकडणार?

----------------------------------------

       सुरवातीला तपासासंबंधीच्या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यामध्ये फडके हौद भागातील ज्या सायकल दुकानदारांकडून अतिरेक्यांनी सायकली खरेदी केल्या होत्या त्यानी आपण आरोपींना ओळखू असे सांगितले होते. पण तपासणी यंत्रणेने अटक आरोपींची ओळख परेड घेतली नाही. तपासात अशा अनेक त्रुटी आहेत. म्हणून या गुन्ह्याचा फेर तपास करुन खालील प्रमाणे अधिक तपास करणे आवश्यक आहे:

1 दयानंद पाटील याची नार्को टेस्ट घेऊन त्याचे कडून प्रमुख सूत्रधारांची नांवे मिळविणे,

2 सायकल विक्रेत्यांनी दिलेल्या वर्णनावरून खरे आरोपी शोधून काढणे,

3 पोलीसांनी सुरवातीला जप्त केलेल्या सी सी टी व्ही फूटेजना प्रसिध्दी देऊन खरे आरोपी शोधून काढणे.


मा. अंजुम इनामदार

अध्यक्ष: मूलनिवासी मुस्लिम मंच पुणे. 9028402814

Post a Comment

Previous Post Next Post