पर्वती विधानसभा मतदार संघात रवींद्र धंगेकर यांचा उत्साही प्रचार..

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे : केंद्रात व राज्यात सत्ता आणि पुण्यात ६ आमदार व सुमारे १०० नगरसेवक असूनही गेल्या १० वर्षात पुण्याच्या विकासाला खीळ का बसली? आणि पुण्याच्या विकासाबद्दल भाजपला आकस आहे काय? असे  प्रश्न पुणेकरांना पडले आहेत. त्यामुळेच पुण्यात भाजप बद्दल नकारात्मक भावना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. गेल्या १० वर्षात केंद्र व राज्य सरकारमध्ये सत्ता असूनही भाजपने मोठा विकासनिधी पुण्यासाठी आणला नाही त्यामुळे वाहतूक कोंडी, सुरळीत पाणी पुरवठा, पर्यावरण असे अनेक प्रश्न आता बिकट बनले आहेत. आपल्या पुण्याला खऱ्या अर्थाने ‘सुखी शहर’ करण्यासाठी परिवर्तन करा आणि पंजाच्या चीन्हापुधील बटन दाबून काँग्रेसला विजयी करा असे आवाहन महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज केले. 

पार्वती विधानसभा मतदार संघातील पदयात्रा संपल्यानंतर ते बोलत होते. 

    यापूर्वी ‘काय म्हणतात पुणेकर? निवडून येणार धंगेकर' च्या जोरदार घोषणा देत महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पर्वती विधानसभा मतदार संघात अतिशय उत्साही प्रचार केला. 

       पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आपला निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रचाराचा धडाका सुरू केला. सकाळच्या सत्रात 

      उत्साही कार्यकर्ते कसबा विधानसभा मतदार संघात पदयात्रा केल्यानंतर, संध्याकाळी त्यांनी पर्वती विधानसभा मतदार संघात प्रचार यात्रा घेतली. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी या पदयात्रेत सहभागी होत, धंगेकर यांचा अतिशय उत्साहाने प्रचार केला. काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी आणि अन्य मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते अशा विविध पक्षांचे अनेक कार्यकर्ते आवर्जून सहभागी झाले होते. यामध्ये अभय छाजेड, नितीन कदम, अश्विनी कदम, सतीश पवार, शशीकांत तापकीर, सचिन तावरे,  रमेश सोनकांबळे, संतोष पाटोळे , नरेंद्र व्यवहारे, बंडू नलावडे, हरीश यादव, अशोक हरणावळ, बाळासाहेब ओसवाल, बाळासाहेब भांबरे, जयकुमार ठोंबरे, अर्जुन जानगवळी, डी एच पोळेकर, संजय उपरंडे, स्वप्नील नाईक, संतोष गेले, गणेश लगट, विजय शिंदे, आशुतोष शिंदे, सचिन देढे, सुरेश चौधरी, मृणालिनी वाणी, ऋषिकेश भुजबळ, तुषार नांदे, प्रतीक खोपडे, अनिल सातपुते , सतीश पवार, संतोष गेडे, सुधीर ढमाले, ताई कसबे, अमोल परदेशी, अर्चना शहा, आकाश मोहिते, सोमनाथ खंडाळे, अजय मिसळ महादेव जाधव, धर्मेंद्र धावरे, जयराम भोसले, श्रीरंग खंडाळे, अक्षय सागर, रोहित पवार, अमोल खंडाळे, मुकुंद काकडे, प्रवीण खत्री, शैलेश मोहिते, बाळासाहेब मोहिते, पराग थोरात आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता. 

         सर्वत्र स्वागत या पदयात्रेची सुरुवात शुक्रवारी सायंकाळी ५:३० वाजता सहकारनगर भागातील गजानन महाराज मंदिर येथून झाली. या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी अतिशय आनंदाने रवींद्र धंगेकर यांचे स्वागत केले. त्यानंतर ड्रम, ताशा या वाद्यांच्या  साथीने पदयात्रेस सुरुवात झाली. बागुल उद्यान परिसर, शिवदर्शन, सहकारनगर, शनी मंदिर- तावरे कॉलनी – संजय नगर – शिंदे हायस्कूल – तावरे बेकारी – ट्रेजर पार्क – मोगल वसाहत – गोल मंदिर- सहकार नगर पोलीस स्टेशन – नवजीवन चौक – खांडेकर शाळा– दाते बसस्टॉप– महात्मा गांधी चौक – लक्ष्मण उकीरंडे यांचे रेशन दुकान पासून आत – खंडाळे  चौक – ओम मित्र मंडळ चौक – लुंकड शाळा – विणकर सभागृह – तीन हत्ती चौक – संभाजी नगर मार्गे प्रवास करत ही पदयात्रा सातारा रस्ता येथील शंकर महाराज वसाहत येथे समाप्त झाली. 

      पदयात्रे दरम्यान अनेक ठिकाणी स्थानिक महिलांनी धंगेकर यांचे औक्षण केले. तर स्थानिक कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले तसेच निवडणूकिसाठी शुभेच्छा देखील दिल्या. अनेक ठिकाणी धंगेकर यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच फटाक्यांचा जल्लोष देखील यावेळी पाहण्यास मिळाला. 

       पदयात्रेप्रसंगी धंगेकर यांनी ठीकठिकाणी मंदिरांचे दर्शन घेतले. शिवदर्शन येथे राहुल युवक संघटना कार्यालय येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे दर्शनही त्यांनी घेतले. या प्रचार सभेदरम्यान त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला, तसेच परिसरातील व्यापारी वर्ग, विक्रेते, कामगार यांच्याशीही संवाद साधला. नागरिकांनी अतिशय आनंदाने धंगेकर यांचे स्वागत केले. अनेक नागरिक स्वतः वाहन थांबवून धंगेकर यांना अभिवादन करत होते. तर काही जण काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेल्या पंजासोबत, धंगेकर यांच्यासोबत तसेच प्रचारासाठी सजविण्यात आलेल्या विशेष वाहनासोबत सेल्फी देखील घेत होते. एकूणच पहिल्याच दिवशी घेण्यात आलेल्या या पदयात्रेला नागरिकांनी देखील उस्फूर्त प्रतिसाद दिला.

अरविंद शिंदे 

अध्यक्ष,

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी 

98220 20005

Post a Comment

Previous Post Next Post