कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा आम्ही निश्‍चितपणे जिंकू.

 महाराष्ट्राचे भाजपाचे निवडणूक सहप्रभारी निर्मलकुमार सुराणा यांना विश्‍वास

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.२०  महायुतीसाठी गत वेळेपेक्षा यंदाचे वातावरण अतिशय चांगले आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा आम्ही निश्‍चितपणे जिंकू, असा विश्‍वास महाराष्ट्राचे भाजपाचे निवडणूक सहप्रभारी निर्मलकुमार सुराणा यांनी व्यक्त केला. 

भारतीय जनता पक्षाच्या इचलकरंजी शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत  सुराणा बोलत होते.



निर्मलकुमार सुराणा म्हणाले, गेल्या दहा दिवसात  मी सहा लोकसभा मतदारसंघांचा दौरा केला आहे. सर्वच ठिकाणी आमच्या उमेदवारांची उत्तम परिस्थिती आहे. प्रत्येक बूथनिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे. 100 वॉरिअर्सची नियुक्ती केली जाणार आहे. अत्यंत शिस्तबध्दरित्या प्रचार यंत्रणा राबवून आम्ही निश्‍चिपणे 400+ चा आकडा पार करु. शहरामध्ये रॅलीचे आयोजन करण्याबरोबरच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा घेण्यासंदर्भात  नियोजन सुरु आहे. सातारा कोल्हापूर हातकणंगले येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होण्याची शक्यता आहे . 

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी खासदार धैर्यशील माने यांनी गत दहा वर्षात मतदारसंघात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले आहे. राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देतानाच देशातील सामान्य नागरिकांना विविध योजनांचा लाभ दिला आहे. धैर्यशील माने यांनी 8200 कोटी रुपयांची कामे केली आहेत.गत निवडणूकीतील 75 हजाराच्या मताधिक्क मिळाले होते. यंदाही 2024 ला भाजपा महायुती मित्र पक्षांच्या सहकार्य ने एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य महायुतीला उमेदवार धैर्यशील माने यांना मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

प्रारंभी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी निर्मलकुमार सुराणा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर,भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, शहराध्यक्ष पै. अमृत भोसले, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे, शिवसेना शहराध्यक्ष भाऊसो आवळे,जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, सांगायो अध्यक्ष अनिल डाळ्या

सरचिटणीस राजेश रजपुते,बाळकृष्ण तोतला, मिश्रीलाल जाजू, विनोदी काकाणी,मनसे शहरअध्यक्ष रवि गोंदकर, प्रताप पाटील, अरविंद शर्मा,प्रसाद खोबरे, अँड भरत जोशी दिपक पाटील महेश पाटील,उमाकांत दाभोळे संजय गेजगे, अमित जावळे, अरविंद चौगुले नामदेव सातपुते हेमंत वरूटे ऋषिकेश मराठी, सचिन दरींबे   आदी महायुती चे पदाधिकारी उपस्थित होते.

__________

प्रसिद्धी प्रमुख 

उमाकांत दाभोळे उपाध्यक्ष भाजपा मिडिया प्रबंधक लोकसभा हातकणंगले

Post a Comment

Previous Post Next Post