गांधीनगर येथे फाळकूट दादा कडून कापड व्यावसायिकास जब्बर मारहाण.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - गांधीनगर येथे कापड व्यावसायिक कैलास गोपालदास कटार (वय.47.रा.गणेश टॉकीज जवळ,गांधीनगर) यांना दोन्ही हातावर बाटलीने मारल्याने त्याच्या गंभीर दुखापत होऊन जखमी झाले आहेत.तर त्याचे दाजी संजय हेमतदास जुनाणी (वय.64) यांच्या तळहातावर खुर्ची मारल्याने किरकोळ जखमी झाले आहेत.या बाबतची फिर्याद सुनिल राजकुमार कटार (रा.गांधीनगर )यांनी सीपीआर पोलिस चौकीत दिली आहे.

अधिक माहिती अशी की,कैलास कटार यांचे गणेश टॉकीज जवळ पुनम होजिअरी नावाचे दुकान आहे.या दुकानात 4च्या सुमारास प्रशांत मिसाळ आणि अक्षय चावला हे आपल्या साथीदारासह येऊन पैशाची मागणी करु लागले जखमी कटार यांनी नकार देताच या टोळक्यांनी कैलास कटार यांच्या दोन्ही हातावर बाटलीने मारल्याचे सांगून त्याना अडविताना त्यांच्या दाजीनाही तळहातावर खूर्ची मारल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत.त्याच्यावर प्राथमिक उपचार तेथील आरोग्य केंद्रात घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.हे टोळके तेथील व्यापारी वर्गाकडे वरचेवर पैसे मागून त्रास देत आहेत.आणि पैसे नाहीतर मारहाणीच्या घटना घडत आहेत.त्यांच्या रोजच्या त्रासला व्यापारी वर्ग हैराण झाले असून त्यां टोळक्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी व्यापारी वर्गातुन होत आहे.जखमी कटार यांनी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी भाच्याला याच कारणातुन मारहाण झाल्याचे सांगीतले.

Post a Comment

Previous Post Next Post