प्रसिद्ध वकील मा श्री लाझिम मुजावर यांना 2024 चा आधार गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : आमचे जिवलग मित्र व इचलकरंजी शहरातील प्रसिद्ध वकील मा श्री लाझिम मुजावर साहेब यांना आज आधार बहुउद्देशीय सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक व क्रीडा संस्था इचलकरंजी यांच्यावतीने विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल इचलकरंजी शहरातील प्रसिद्ध व जेष्ठ डॉक्टर मा श्री एम बोरगावे यांचे शुभहस्ते 2024 चा आधार गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

           



  याप्रसंगी आधार  संस्थेचे अध्यक्ष तौफिक मुजावर, मा नगरसेवक लतीफ गैबान,उद्योजक मेहबूब मुजावर,हारून पाणारी,मा नगरसेविका बिलकिश मुजावर, मौलाना आझाद इंग्लिश स्कुलच्या अध्यक्षा साजिदा मुजावर,युसूफ तासगावे तसेच आधारचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post