डॉ. आंबेडकर जयंती दिनी आझम कॅम्पसची अभिवादन मिरवणूक

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :‘ महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस)च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त  अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार यांच्या मार्गदर्शनखाली  १४ एप्रील रोजी सकाळी ९.३०  वाजता साधू वासवानी चौकातून या मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे.

संस्थेचे सचिव प्रा .इरफान शेख यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.दरवर्षी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात. हजारो विद्यार्थी  त्यात सहभागी होतात.त्यातून महामानवांचे सामाजिक ,शैक्षणिक संदेशांचा  प्रसार केला जातो.




Post a Comment

Previous Post Next Post