घरफोडी करणाऱ्या दोघां चोरट्यांना अटक .

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर-कोल्हापुरातील रुक्मिणीनगर येथे असलेल्या डॉ.बाफना स्टार सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये क्यश कौन्टरचे ड्रॉव्हर उचकटून त्यातील रोख रक्कम अनोळखी व्यक्तीने चोरुन नेल्याची घटना ता.01/04/24 ते 02/04/24 या दरम्यान घडली होती.

याची फिर्याद हॉस्पिटलचे व्यवस्थापक अमोल मनोहर मेस्त्री (भोगम कॉलनी,पाचगाव) यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात दिली असता पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गु न्हा दाखल केला. हॉस्पिटल मध्ये अशा प्रकारे चोरी होणे ही गंभीर बाब असल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर यांना तपासाच्या सूचना दिल्या.या पथकाने हॉस्पिटलची पहाणी करून तेथील स्टाफची माहिती घेत असताना या हॉस्पिटल मध्ये पूर्वी ड्रायव्हर म्हणून काम करीत असलेला अमोल जाधव यांनी आणि सध्या ड्रायव्हर म्हणून काम करीत अ सलेला अमित फराकटे (दोघे रा.भोसलेवाडी) यांनी केल्याची माहिती मिळाली.

हे दोघे टेंबलाईवाडी येथे असलेल्या उड्डाणपूला जवळ 03/04/24 रोजी येणार असल्याची पक्की खबर मिळाली असता पोलिसांनी त्या ठिकाणी साध्या वेषात सापळा रचून रात्री पावणे नऊच्या सुमारास त्या दोघांना पकडून त्यांच्या कडील 1लाख 60 हजार रुपये रोख रक्कम मिळून आली असता याबाबत चौकशी केली असता त्यानी डॉ.बाफना हॉस्पिटल मध्ये चोरी केल्याची कबुली दिली.पोलिसांनी 1 लाख 60 हजार रुपये रोख आणि मोटरसायकलसह दोन मोबाईल असा 2 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करून पुढ़ील तपासासाठी शाहुपुरी पोलिसांच्या या दोघांना ताब्यात दिले .सदरचा गुन्हा या पथकाने अवघ्या 24 तासात उघडकीस आणल्याने पोलिस अधीक्षक मा.महेद्र पंडीत यांनी या पथकाचे अभिनंदन केले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,सहा.पो.नि.सागर वाघ,पो.उपनिरीक्षक संदिप जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post