भाजपा जैन प्रकोष्ठ प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी अशोक सालेचा


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी/प्रतिनिधी -

उपकार ग्रुपचे सर्वेसर्वा अशोकजी सालेचा यांची भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ प्रदेश सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. भाजपा जैन प्रकोष्ठचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी यांच्या हस्ते आणि प्रदेश समन्वयक मेघ गांधी, प्रदेश सचिव व हातकणंगले लोकसभा समन्वयक प्रितम बोरा आणि कोल्हापूर शहर अध्यक्ष प्रितेश कर्नावट यांच्या प्रमुख उपस्थितीत सालेचा यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.


भाजपा इचलकरंजी विधानसभा समन्वयक अभय बाबेल यांच्या निवासस्थानी प्रमुख पदाधिकार्‍यांचा मेळावा पार पडला. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष पै. अमृत भोसले, शिवसेना शहराध्यक्ष भाऊसो आवळे, विनोद कंकाणी, ओमजी पाटणी, पद्मजी खाबिया, माजी नगरसेवक दिलीप मुथा यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सर्वांनी गट-तट विसरून महायुतीतील प्रत्येकाला सोबत घेऊन मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची निर्णायक भूमिका बजवावी, असे आवाहन संदीप भंडारी यांनी केले. या बैठकीत इचलकरंजीतील यशस्वी उद्योगपती, दानशूर व्यक्तिमत्त्व तथा उपकार ग्रुप चे सर्वेसर्वा अशोक सालेचा यांची भाजपा जैन प्रकोष्ठ प्रदेश सदस्यपदी प्रदेश सचिव प्रितम बोरा यांच्या मागणीवरुन निवड जाहीर करण्यात आली. या निवडीनंतर आचार्यश्री आनंद युवा मंचच्या वतीने अशोक सालेचा यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, आचार्यश्री आनंद युवा मंचचे योगेश भळगट यांच्या मनियोग फूड पॉईंट अ‍ॅण्ड गिफ्ट शॉपीला संदीप भंडारी यांनी सदिच्छा भेट दिली.

Post a Comment

Previous Post Next Post