अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर लोकसभेसाठी आम आदमी पक्षाची भूमिका

  

प्रेस मीडिया लाईव्ह :

आम आदमी पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली. यावेळी आम आदमी पक्षाच्या वतीने महाराष्ट्र कार्याध्यक्ष अजित फाटके (पाटील), महाराष्ट्र राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री संदीप देसाई हे उपस्थित होते. 

यावेळी पत्रकारांना संबोधित करताना कार्याध्यक्ष अजित फाटके (पाटील) म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षातर्फे भाजपा च्या धोरणांविरोधात प्रचार केला जाणार असून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम आदमी पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करेल. आम आदमी पक्ष हा इंडिया फ्रंट मधील एक महत्त्वाचा घटक पक्ष असून इंडिया फ्रंटच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार पक्षाकडून या निवडणुकीसाठी केला जाणार आहे. *भाजपाने आपकी बार 400 पार हा जो नारा दिला आहे त्याच्याविषयी बोलायचे झाले तर भाजपने हा नारा केवळ भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात आयात करून त्यांच्या विश्वासावर दिल्याचे दिसून येते. एकीकडे नरेंद्र मोदी म्हणतात, आम्ही जर तिसऱ्यांदा सत्तेत आलो तर भ्रष्टाचार करणाऱ्यांना माफ करणार नाही. आणि दुसरीकडे सगळ्याच भ्रष्टाचारांना भाजपामध्ये घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष पळापळ करत आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले अनेक नेते आत्तापर्यंत भाजपावासी झाले आहेत असे असताना आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणार ही माननीय पंतप्रधानांची भूमिका हास्यास्पद आहे. एकेकाळी केवळ एक मत कमी मिळाल्याने अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार पडले होते त्या परिस्थितीतही त्यांनी कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार केला नव्हता किंवा इतर पक्षांचे उमेदवार फोडले नव्हते. परंतु आज दुर्दैवाने सत्ता टिकवण्यासाठी केवळ उमेदवारच नव्हे तर अनेक राजकीय पक्ष देखील भाजपकडून फोडले जात आहेत.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची काही दिवसापूर्वीच एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे ज्यात त्यांना विचारले होते की, भ्रष्टाचाराच्या आरोप असलेल्या लोकांना तुम्ही तुमच्या पक्षात घेणार का? यावर त्यांनी अशा लोकांना पक्षात घेण्यात काही अडचण नसल्याचे बोलून दाखवले होते. महाराष्ट्रातील भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा देखील व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला असून त्यात ते भाजपची पोलखोल करत असल्याचे दिसून येते. भाजपा कशाप्रकारे वेगवेगळ्या तपास यंत्रणांना हाताशी धरून सापळा लावते आणि विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपात येण्यासाठी प्रवृत्त करते याची स्पष्ट माहिती त्यांनी न्यूज चैनल शी बोलताना सांगितली असून, सुज्ञ नागरिकांनी भाजपावर आता किती विश्वास ठेवावा हा प्रश्न निर्माण झाला आहे.

ज्या काँग्रेसला विरोध करून तुम्ही दिल्लीतील सत्तेत आला त्याच काँग्रेस बरोबर तुम्ही आता का सामील झाला आहात?* पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री संदीप देसाई म्हणाले, भाजपला ज्या विश्वासाने जनतेने सत्तेची चावी दिली होती तो विश्वास भाजपने आता गमावला आहे. जनता भ्रष्टाचाराला कंटाळली होती म्हणूनच 2014 मध्ये काँग्रेसचा पराभव करून जनतेने भाजपला विजयी केले होते. परंतु आज अशी परिस्थिती आहे की सगळे घोटाळेबाज हे भाजपाची वाट धरत आहेत आणि भाजपही त्यांचे दोन पावले पुढे होऊन स्वागत करत आहे. हा प्रकार म्हणजे जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे. काँग्रेस मधील भ्रष्टाचारी भाजपा मध्ये गेल्याने काँग्रेस भ्रष्टाचार मुक्त झाली आहे. *आम आदमी पक्ष हा नेहमीच भ्रष्टाचाराविरुद्ध काम करत राहिला असून, भाजपामध्ये जे भ्रष्टाचारी लोक जात आहे त्यांना सत्तेपासून रोखण्यासाठीच आम आदमी पक्षाने काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी केली आहे. खरे तर भ्रष्टाचाराला कुठलीही विचारधारा नसते त्याला केवळ सत्तेची लालसा असते.* आम्ही एकेकाळी दिल्लीमध्ये काँग्रेसला हरवूनचं सत्तेत आलो असलो तरी आता काँग्रेस पक्ष बदलला आहे दहा वर्षांपूर्वी ची काँग्रेस आणि आत्ताची काँग्रेस यामध्ये फार मोठा फरक आहे. तसेच लोकशाही वाचवण्यासाठी देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांना एक दुसऱ्याबरोबर सहयोग करणे गरजेचे असते त्याच विचाराने आज आम्ही त्यांच्याबरोबर आघाडीमध्ये आहोत.

भाजपाला विरोध करण्याचे प्रमुख कारण म्हणजे भाजपा हा संख्याबळाच्या जोरावर लोकशाही संपवण्याचा खेळ खेळत आहे यासाठी लागणारा अमाप पैसा भाजपकडून खंडणीच्या स्वरूपात वेगवेगळ्या उद्योजकांकडून मिळवला जात आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे सध्याचा गाजत असलेला इलेक्ट्रॉल बाँण्ड चा विषय.

जनता ही प्रत्येक राजकीय पक्षाला केवळ पाच वर्षासाठीच नियुक्त करत असते पण जनतेचा विश्वासघात करून भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात सामावून घेत भाजपाला परत परत सत्ता हवी आहे असा प्रकार लोकशाहीला घातक असल्यानेच आम्ही भाजप विरोधात प्रचार करणार असून इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील उमेदवारांनाच निवडून देण्याची जनतेला विनंती करणार आहे.

याप्रसंगी पत्रकार परिषदेचे नियोजन पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे आणि धनंजय बेनकर, मीडिया सहसंयोजक ॲड.अमोल काळे, निरंजन आढागळे आणि किरण कद्रे यांनी केले.



आम आदमी पक्ष

मीडिया टीम

9890616602

Post a Comment

Previous Post Next Post