मोठी बातमी : पुणे महानगरपालिकेतील एका अधिकार्‍याच्या टेबल ड्रॉव्हर मध्ये सापडले अंदाजे दोन ते तीन लाख रुपयांची रोख रक्कम

 पुणे महानगरपालिकेतील लाच खोरीचा पर्दाफाश

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे महानगरपालिकेतील एका अधिकार्‍याच्या टेबल ड्रॉव्हर मध्ये अंदाजे   दोन ते तीन लाख रुपयांची रक्कम असलेल्या नोटांचे बंडल सापडल्याने  जोरदार खळबळ उडाली आहे . ' आम  आदमी च्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यावर संबंधित अधिकार्‍याने उडवाउडवीची उत्तरे देत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.या घटनेने मात्र महानगरपालिकेत चालत असलेला लाचखोरीचा  पर्दाफाश झाला आहे .



पथ विभागातील एका अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयात ही घटना घडली. आम आदमी पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहरातील युवकचे कार्यकर्ते रविराज काळे हे बाणेरमधील एक तक्रार घेऊन पथ विभागाच्या अधीक्षक अभियंत्याकडे आले होते. त्या वेळेस या कार्यालयातील एका कनिष्ठ अभियंत्याला एका ठेकेदाराने नोटांचे बंडल असलेले बंद पाकीट दिल्याचे काळे यांनी पाहिले. या अभियंत्याने हे पाकीट टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवून दिले.

 हा प्रकार पाहिल्यानंतर काळे व त्यांच्या सहकार्‍यांनी संबंधित अभियंत्याला विचारणा केली, त्यावर या अभियंत्याने एका ठेकेदाराने हे पैसे थोड्या वेळासाठी आपल्याकडे ठेवायला दिले असल्याची उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, काळे यांनी ड्रॉव्हरमधून ते पाकीट बाहेर काढले, ते फोडल्यानंतर त्यात दोन ते तीन लाखांची रक्कम असल्याचे दिसून आले. संबंधित अभियंत्याला त्याबाबत व्यवस्थित उत्तरे देता न आल्याने काळे हे संबंधित अधीक्षक अभियंत्याकडे गेले. त्यांना याबाबत समाधानकारक उत्तरे देता आली नसल्याचे काळे यांनी सांगीतले . या बाबत  रविराज काळे आज लाच लुचपत  विभगा कडे रितसर तक्रार दाखल करणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post