प्रबोधिनीत विद्यार्थ्यांची अभ्यास भेट

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.६  रयत शिक्षण संस्थेच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर (बुर्ली )ता.पलूस जि. सांगली या महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थीगटाने समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयास अभ्यास भेट दिली.

 प्राचार्य प्रो.डॉ.यू. व्ही. पाटील या आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ.पी.बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा.एस. आर.कुंडले यांच्या नेतृत्वाखाली वैष्णवी संदीप पाटील ,प्रेरणा महेंद्र होवाळ, सचिता गणपती कांबळे ,संकेत चंद्रकांत कांबळे ,निलेश नंदू सकत या विद्यार्थ्यांनी समाजवादी प्रबोधिनीचे व प्रबोधन वाचनालयाचे संपूर्ण काम समजून घेतले.

 सौदामिनी कुलकर्णी यांनी त्यांना सर्व कामकाजाची सविस्तर माहिती दिली. प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाचे खंड आणि प्रबोधन वाचनालयातील विविध वांग्मय प्रकारातील ग्रंथसंपदा यामध्ये हे विद्यार्थी रममाण झाले होते. माजी नगरसेवक अजितमामा जाधव आणि नंदकिशोर जोशी यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ.एस.आर.कुंडले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post