रिक्षा चालक यांच्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे जुना राजवाडा पोलीस ठाणे चे प्रभारी अधिकारी संजयकुमार झाडे यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : आज दिनांक १८/०३/२०२४ रोजी यश संजय मापारी , रा. महेकर जि. बुलढाणा हे महालक्ष्मी मंदिर दर्शना करिता एका रिक्षातून आले असता त्यांची रिक्षामध्ये बॅग  विसरीली होती त्यामध्ये ४००० रु रोख रक्कम व सोनी कंपनी चा २ लाख रु किमतीचा कॅमेरा असे साहित्य होते ,

 ठाणे अंमलदार काटकर यांनी लागलेच पो कॉ ४७२ लगारे आणी पो कॉ १४५१ कुराडे यांना cctv  पाहण्यासाठी तात्काळ पाठवले असता फुटेज पाहण्यापूर्वीच रिक्षा नं. MH 09 J 9045 यावरील चालक रमजान महम्मद सय्यद रा.प्लॉट नं २१ साई कॉलनी आपटेनगर कोल्हापूर यांनी सदरची  बॅग त्यातील सर्व साहित्य हे प्रामाणिकपणे ठाणे अंमलदार काटकर यांच्या कडे जमा केले , रिक्षा चालक यांच्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे जुना राजवाडा पोलीस ठाणे चे प्रभारी अधिकारी संजयकुमार झाडे यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

Post a Comment

Previous Post Next Post