क्राईम न्यूज : खालापुर हत्याकांडातील आरोपीतास स्थानिक गुन्हे शाखा रायगड ने उन्नाव उत्तरप्रदेश येथुन घेतले ताब्यात.



प्रेस मीडिया लाईव्ह :

विशेष प्रतिनिधी  ; सुनील पाटील

दिनांक 26/04/2025 रोजी 13.00 वाजता खालापूर पोलीस ठाणे हद्दीत मौजे नावंढे गावच्या हद्दीत खोपोली कर्जत रेल्वे लाईन कि.मी स्टोन क्र. 107/4 चे ब्रिजजवळ अनोळखी पुरुष जातीचे वय वर्ष अंदाजे 40 ते 50 वर्ष यास कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणामुळे त्याचे डोक्यात कोणत्यातरी हत्याराने जखम करून त्यास जीवेठार मारून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचेवर दगड रचून ठेवले. म्हणून खालापूर पोलीस ठाणे येते गु.र.नं. 129/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1), 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

उपरोक्त गुन्हयाचा समांतर तपास करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सहा. पोलीस निरीक्षक नागेश कदम, पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर व 12 अंमलदार यांचे दोन पथक तयार करण्यात आले सदर दोन्ही पथकांनी सदर गुन्हयाचा समांतर तपास केला. सदर पथकानी आपले कौशल्य पनाला लावुन तांत्रिक तपास केला तसेच गोपनीय माहीती प्राप्त केली. तांत्रिक तपासामधुन सदर गुन्हयातील संशयीत ईसम जि. उन्नाव उत्तरप्रदेश येथे असल्याची माहीती प्राप्त झाली. त्यावरून वरिष्ठांची परवानगी घेवुन पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर व 4 अंमलदार यांना तात्काळ रवाना करण्यात आले. सदर पथकाने तांत्रिक तपासात निष्पन्न झालेला संशियत इसम नामे लवकुश राजा पासवान वय-24, रा. कुलाहा ता. हसनगंज जि.उन्ना उत्तरप्रदेश यास त्याचे राहते गावातुन ताब्यात घेतले. सदर इसमाकडे सदर पथकाने दाखल गुन्हयाबाबत चौकशी केली परंतु तो उपयुक्त माहीती देत नव्हता परंतु तांत्रिक तपासामध्ये त्याचा सहभाग निष्पन्न होत असल्याने त्यास पुढील चौकशीकामी ताब्यात घेवुन अलिबाग येथे घेवुन आले. आज रोजी या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहा. पोलीस निरीक्षक नागेश कदम, पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर यांनी त्याचेकडे उलट सुलट प्रश्न करून आपले तपासाचे कौशल्य पनाला लावुन चौकशी केली. सदर आरोपी उत्तर देण्यास निरूत्तर झाला व अखेर त्याने गुन्हयाची कबुली दिली.

सदर आरोपीताकडे दिलेल्या चौकशीमध्ये त्याने माहीती दिली की, मयत सुभाष त्रिलोकब्रिज विष्वकर्मा रा. गोरखपुर उत्तरप्रदेश हा गोदरेज कंपनी खालापुर येथे कामांस असुन आरोपीत याचे शेजारी गेले 4 ते 5 दिवसांपुर्वी राहण्यास होता. त्या दोघांची ओळख झाल्याने मयत सुभाष हा आरोपीत याचेकडे राहण्यास आला होता. दिनांक 22/04/2025 रोजी मयत व उपरोक्त आरोपी यांनी दोघांनी नशापान केले होते. त्यानंतर काही कारणारून दोघांमध्ये शिवीगाळ व बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपीतांने त्याला खाली पाडुन जवळच असलेला मोठा दगड घेवुन छातीवर व डोक्यावर मारून त्याचा खुन केला व त्याचा मृतदेह दिसुन येवु नये म्हणुन त्याचे मृतदेहावर त्याने दगडे ठेवुन त्याचे मृतदेह झाकुन ठेवुन तो त्या ठिकाणावरून पसार झाला त्यानंतर तो रेल्वेने त्याचे मुळगावी उत्तरप्रदेश येथे निघुन गेला.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि नागेश कदम, पोलीस उपनिरीक्षक लिंगाप्पा सरगर, सहा. पोलीस उपनिरीक्षक संदिप पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक प्रसाद पाटील, पोह/प्रतिक सावंत, पोह/राकेश म्हात्रे, पोह/सुधीर मोरे, पोह/रविंद्र मुढें, पोह/अक्षय जाधव, पोह/जितेंद्र चव्हाण, पोह/अक्षय पाटील, पोशी/तुशार कवळे यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post