रसायनी येथे सहा वर्षापूर्वी घडलेल्या हत्याकांडातील 2 आरोपींना अटक

  स्थानिक गुन्हे शाखा, रायगड यांच्या अथक प्रयत्नांना यश


प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

दिनांक 13/04/2018 रोजी रात्री 09:30 वा.चे सुमारास रसायनी पोलीस ठाणेला माहिती प्राप्त झाली होती की, रसायनी पोलीस ठाणे हद्दीत चावणे गाव ते पेट्रो नॉस कंपनीकडे जाणा-या रोडने एका नाल्यामध्ये एक इसमाचा धारधार शस्राने अंगावरती वार करून निघून खून करून मृतदेह फेकून दिलेला आहे. सदरची खबर देणारा इसम नामे श्री. विश्वनाथ वामन गायकवाड, वय-46 वर्ष रा. कष्टकरी नगर, ता. खालापूर यांची फिर्यादी खबर घेवून रसायनी पोलीस ठाणे गु.र.नं.30/2018 भा.द.वि कलम 302, अन्वये नोंद करण्यात आला.

त्यावेळी सदर गुन्ह्याचा तपास रसायनी पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांनी केला. त्यावेळी मयताची ओळख पटविण्यात आली होती. मयत इसमाचे नाव जयेश काशिनाथ खुडे असे निष्पन्न झाले होते. सदर वेळी अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्यात आला परंतु आरोपी निष्पन्न झाले नव्हते. तसेच आरोपी मिळून आले नाहीत. त्यामुळे सदरचा गुन्हा कायम तपासावरून ठेवून सदर गुन्ह्याची अ समरी मा. न्यायालयात सादर करण्यात आली होती.


मा.श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक रायगड, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब खाडे यांना रायगड जिल्ह्यातील उघडकीस न आलेले खुनाचे गंभीर गुन्हे उघड करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी जिल्ह्यातील उघड न झालेले खुनाचे गुन्हे पुन्हा तपासावर घेतले. त्यापैकी वर नमूदचा गुन्हा उघड करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/श्री. संदिप पोमण व पथकाला सूचना दिल्या. त्याप्रमाणे सपोनि/श्री. संदिप पोमण व पथकातील अंमलदार सफौ/राजेश पाटील, सफौ/प्रसाद पाटील, पोह/यशवंत झेमसे, पोह/संदिप पाटील, पोह/राकेश म्हात्रे, पोह/सुधीर मोरे यांनी आपले कौशल्य पणाला लावून त्यांचे गोपनीय बातमीदारांना सतर्क करून सदर गुन्ह्यातील आरोपी ओमकार सुनील शिंदे, वय-25 वर्ष, रा.समर्थकृपा सदन, वावंढळ, ता. खालापूर यास ताब्यात घेवून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा त्याने त्याच्या साथीदार आरोपी रोहित विष्णु पाटील, रा. चांभार्ली, ता. खालापूर यांच्या मदतीने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर गुन्ह्यातील आरोपी रोहित विष्णु पाटील यास कर्जत, जामखेड, जि. अहमदनगर येथून ताब्यात घेतले आहे.


सदरचा गुन्हा 6 वर्षाचा कालावधी जावून सुद्धा कुठल्याही प्रकारचा धागा दोरा पुरावा नसताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपले कौशल्य पणाला लावून पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब खाडे, सपोनि/श्री. संदिप पोमण व पथकाने अहोरात्र मेहनत करून सदरचा गुन्हा उखडकीस आणून मोलाची कामगिरी केली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. बाळासाहेब खाडे, सपोनि/श्री. संदिप पोमण, सफौ/राजेश पाटील, सफौ/प्रसाद पाटील, पोह/यशवंत झेमसे, पोह/संदिप पाटील, पोह/राकेश म्हात्रे, पोह/सुधीर मोरे व सायबर पोलीस ठाणेतील पोना/तुषार घरत, अक्षय पाटील यांनी गुन्ह्याच्या तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

जन संपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड अलिबाग

Post a Comment

Previous Post Next Post