कोल्हापुरात 10 हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून होणार मतदार जनजागृती

 नाविन्यपूर्ण उपक्रमाला जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित रहावे - जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

   कोल्हापूर :  सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन 2024 साठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टिने स्वीप (SVEEP) अंतर्गत मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 रोजी सकाळी 7 वाजता महात्मा गांधी मैदान, वरुणतीर्थ वेश, कोल्हापूर येथे शहरातील 38 शाळांमधील 10 हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य मानवी रांगोळी (साखळी) साकारण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

      जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजुलक्ष्मी,  मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी दिली.


    *मानवी रांगोळी (साखळी) संकल्पना -*

यामध्ये 38 शाळांमधील 10 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग (शाळा, स्काउट गाईड, एनसीसी युनिफॉर्ममध्ये), विद्यार्थ्यांमार्फत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती पर घोषवाक्य, 50 कला शिक्षक, क्रीडा शिक्षकांमार्फत मानवी रांगोळीचे रेखाटन. यात 38 शाळा सहभागी होणार आहेत.


एकूण 320 फुट व्यासाच्या वर्तुळात स्वीप आकृती (SVEEP SYMBOL) साकारण्यात येणार आहे. एकूण क्षेत्रफळ 80 हजार 457 चौरस मीटर असेल.

1. My vote is  my future : 1हजार 800विद्यार्थी 

2. Loksabha election 2024 : 500 विद्यार्थी 

3.  तिरंगा सिम्बॉल : 1 हजार विद्यार्थी 

4. SVEEP : 2 हजार 900 विद्यार्थी 

5. Kolhapur : 250 विद्यार्थी

6. I will vote : 950 विद्यार्थी

7. Inter circle single : 1 हजार विद्यार्थी

8. Outer circle double : 1 हजार 600 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 


अशा स्वरुपाच्या भव्य उपक्रमाच्या माध्यमातून निवडणूक मतदार जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती नोडल ऑफिसर (स्वीप) तथा सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी दिली आहे. 

      

Post a Comment

Previous Post Next Post