एका जनावराने दुचाकीला धडक दिल्याने युवती ठार तर मुलगा आणि महिला जखमी.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- कोल्हापूर- गारगोटी मार्गावर घोडके मळा येथे एका जनावरांने दुचाकीला धडक दिल्याने त्या गाडी वरील तिघे जण खाली आपटल्याने अफ्रिन नदीम बुखारी (वय 29) .ही जागीच ठार झाली असून जुबेर शमशुद्दीन काझी (वय 27) आणि फरझाना शमशुद्दीन काझी (वय 45  .रा .कात्यायनी पार्क )हे जखमी झाले आहेत.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. 

  

या बाबतची अधीक माहिती अशी की  ,हे तिघे जण रात्रीच्या सुमारास जुबेर हे  आपल्या आई आणि बहिणी सोबत दुचाकीवरुन घरी जात होते.घोडके मळा येथे आले असता अचानक एक जनावर येऊन त्यांच्या दुचाकीस धडक दिल्याने ते तिघे ही खाली आपटले.त्या वेळी मागुन दुचाकी वरुन येणाऱ्यांनी त्यांचा मोबाईल घेऊन त्याच्या घरच्यांना बोलावून घेऊन जखमीना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच युवतीचा  मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या अपघाताची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post