प्रेस मीडिया लाईव्ह ;
पुणे : (प्रतिनिधी) :
पुणे : सेवा आरोग्य फाऊंडेशन संस्थेचा आठवा वर्धापन दिन रविवार दिनांक १७ मार्च रोजी संध्या. ६.०० ते ८.३० या वेळात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे आणि संस्थेच्या संचालकांच्या हस्ते भारत माता आणि धन्वंतरीच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर सेवा आरोग्य फाऊंडेशनच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचे सादरीकरण झाले.
समृध्दी वर्ग प्रकल्पातील विद्यार्थी आणि शिक्षिकांनी वर्ग कसा चालतो हे दाखवितांना प्रार्थना,गाणे आणि नाच घेतला तसेच पाढे म्हणून घेतले अशी प्रात्यक्षिके दाखवली. घे भरारी किशोर विकास प्रकल्पातील* किशोरींनी शीघ्र योग, दंड योग, दंड साखळी या व्यायाम प्रकारांचे प्रात्यक्षिक दाखवले.आरोग्यवर्धन प्रकल्पातील* कार्यकर्त्यांनी वस्ती मध्ये दवाखाना कसा चालतो हे पथनाट्या द्वारे दाखवले. त्यानंतर सर्व प्रकल्पातील कार्यकर्त्यांनी या प्रकल्पात सहभागी झाल्याने त्यांच्या आयुष्यात काय बदल झाले या विषयी मनोगते व्यक्त केली.
गेल्या वर्षभरात सेवा आरोग्यच्या सर्व प्रकल्पात झालेल्या वेगवेगळ्या कार्याचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारी डॉक्युमेंट्री दाखवण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. महेशराव सूर्यवंशी कोषाध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि वक्ते डॉ. विनायक गोविलकर अर्थतज्ञ, अध्यक्ष श्री.गुरुजी रुग्णालय नाशिक यांचे संचालक श्री. मनोजजी देशमुख यांच्या हस्ते किशोरी विकास प्रकल्पातील मुलींनी तयार केलेली टेबल गुढी आणि नॅपकिन बुके देऊन सत्कार करण्यात आला.
मनोजजी देशमुख संचालक, सेवा
आरोग्य फाऊंडेशन यांनी प्रास्ताविकात संस्था आरोग्यवर्धन, "घे भरारी" म्हणजे किशोरी विकास, सांगाती मेंटोरींग प्रकल्प,समृद्धी वर्ग म्हणजे संस्कार वर्ग आणि नवीन चालू केलेला शैक्षणिक उपक्रम घेतो असे सांगितले. आरोग्यवर्धन मधे २८ दवाखान्यातून गेल्या ३ वर्षात ९१००० पेक्षा जास्त वेळा रूग्ण तपासणी केली, १७ घे भरारी साप्ताहिक वर्गातून ४०० किशोरी सहभाग घेतात, सांगाती प्रकल्पात २९ विद्यार्थी सहभागी आहेत तसेच २० समृद्धी वर्गातून ५०० मुले साप्ताहिक वर्गात येतात अशी माहिती दिली. *८० महिला कार्यकर्त्या हा खरा संस्थेचा आधारस्तंभ आहे* असे ते म्हणाले. पुढे बोलतांना संस्था अधिक चांगली चालण्यासाठी अधिकाधिक व्यक्तींनी विविध उपक्रमात मदत करावी असे आवाहन केले.
प्रमुख पाहुणे दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष श्री. महेशराव सूर्यवंशी यांनी संस्थेच्या उपक्रमांच्या सादरीकरणामधून वस्त्यांमधे चाललेल्या कामाने मी भारावून गेलो असे सांगितले. ट्रस्ट चालवीत असलेल्या ससूनमधील सर्व पेशंट व त्यांचे नातलग यांना रोज भोजन दिले जाते, गरीबांना पथोलॉजी तपासण्या, श्रवणयंत्रे दिली जातात, मोफत अँब्युलन्स सेवा, डोळ्यांची शिबीरे, गरीब मुलांना शैक्षणिक मदत देणे अशा अनेक सेवा कार्याची माहिती दिली. शेवटी सेवा आरोग्यच्या अनेक सेवा कार्यात आम्हाला मदत करायला आवडेल असे सांगितले.
प्रमुख वक्ते अर्थतज्ञ आणि नाशिक च्या श्री- गुरूजी रूग्णालयाचे अध्यक्ष डॉ विनायकराव गोविलकर यांनी सेवा आरोग्यने ८ वर्षात ४० वस्त्यांमधून ६५ सेवाकार्ये असा केलेला विस्तार पाहून मी अचंबित झालो असे मनोगत व्यक्त केले. सेवा ही संकल्पना व्यक्त करतांना ते म्हणाले की आपल्याला काहीतरी दिसते पण आपण ते बघितले पाहिजे, बघितले तर कळले पाहिजे आणि कळले तर प्रत्यक्ष केले पाहिजे. म्हणजे आपल्य हातून सेवा घडेल. अशा सेवा कार्याला आर्थिकदृष्ट्या सशक्त हातांची गरज आहेच. ती मिळवून दिलीच पाहिजे. पण त्याहीपेक्षा वैयक्तिक एक तास देण्यापासून अधिकाधिक वेळ द्यावा तर संस्था अधिक प्रगती करू शकेल असा असे आवाहन केले..
आरोग्यवर्धन प्रकल्पाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली जठार यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ऋतुजा फुलकर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक श्री.मनोजजी देशमुख,श्री. प्रदीपजी कुंटे,डॉ. हर्षदा पाध्ये, श्री. रवींद्रजी शिंगणापूरकर. आणि महानगर सेवा प्रमुख श्री. महेशजी मानेकर उपस्थित होते.
संस्थेचे कर्मचारी, वस्तीमधील कार्यकर्ते, पालक, मुले,सेवा आरोग्य कार्यकर्ते, वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी,देणगीदार,CSR कंपनीचे प्रतिनिधी असे *एकूण ६०० जण उपस्थित होते.* या कार्यक्रमात किशोरी प्रकल्पातील किशोरीनी स्वतः तयार केलेल्या टेबल गुढी विक्री स्टॉल लावण्यात आला होता. त्याला ही खुप छान प्रतिसाद मिळाला.
टीम सेवा आरोग्य
प्रदीप कुंटे
संचालक
सेवा आरोग्य फाऊंडेशन
9822056193
9075081961
फोटो
१)डॉ विनायक गोविलकर बोलतांना
२)महेश सुर्यवंशी बोलतांना
३)मनोज देशमुख पाहुण्यांचे स्वागत करतांना
४)सेवा आरोग्य फाऊंडेशन च्या सेवावृती कार्यकर्त्या वस्तीतील चालणाऱ्या आरोग्य वर्धन प्रकल्पाची माहिती सादर करतांना .