व्याजाने पैसे देऊन सावकारकी करणाऱ्या दोन महिलावर गुन्हा.

   इंचलकरजी येथील प्रकार. 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

इंचलकरंजी - व्याजाने पैसे देऊन पैशासाठी तगादा लावणारयां बेकायदेशीर खाजगी सावकरकी करणाऱ्या इंचलकरंजी येथील सुनिता नेमिनाथ भबिरे आणि ज्योत्स्ना विनोद पाटील (दोघी रा.आयजीएम रुग्णालयात जवळ ,इंचलकरंजी) या दोन महिलांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद उपनिबंधक सहकारी संस्था हातकंणगलेचे मुख्य लिपीक फिरोज दस्तगीर जमादार (रा.कोल्हापूर) यांनी दिली आहे.

   दानोळी (ता.शिरोळ) येथे रहात असलेले संजय रायगोंडा सांगले या इंचलकरंजी येथील भबिरे आणि पाटील या सावकरकी करणाऱ्या महिला कडुन 2020 ला 4 टक्के व्याजाने 2 लाख 30 हजार घेतले होते.सदरची रक्कम फ़ेड करून ही व्याजाला चटावलेल्या आणखी साडे तीन लाख रुपये साठी तगादा लावला.त्यांना वारं वार फोन करून त्रास देऊ लागल्याने तुमच्यावर खोट्या केसेस दाखल करून तुम्हाला जगू देणार नाही असे म्हणत त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना त्रास देऊ लागल्याने याला कंटाळुन शिरोळ येथे उपनिबंधक  यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रार अर्ज दाखल केला.

त्या अर्जाची दखल घेऊन या विभागाने या दोन महिलांची चौकशी करुन वरिष्ठाच्यांकडे अहवाल सादर केला असता जिल्हा उपनिबंधक करे यांनी यांच्यावर कारवाईसाठी फिरोज जमादार यांच्यासह पथकाची नियुक्ती केली होती.या पथकाने भबिरे आणि पाटील या दोन महिलांच्या घराची झडती घेतली असता  या पथकाने काही साहित्य जप्त करून सावकराशी संबंधित काही नोंदी आणि धनादेश सापडले आहेत.या दोन संशयीत महिलांचा पोलिस शोध घेत असल्याचे समजते.

Post a Comment

Previous Post Next Post