बँकांशी निगडीत विविध आदर्श आचारसंहिता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे - जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर  : बँकाशी निगडीत विविध आदर्श आचारसंहिता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व याची माहिती सर्व बँक शाखा पर्यंत बँकाचे जिल्हा समन्वयक यांनी पोहचवाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.  जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक मंगळवारी ताराराणी सभागृह कोल्हापूर येथे संपन्न झाली. यावेळी लोकसभा निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने बँकांनी करावयाच्या कार्याबाबत समाधान शेंडगे उप जिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी व अतुल अकुर्डे मुख्य लेखा, वित्त अधिकारी जिल्हा परिषद तथा नोडल अधिकारी निवडणूक खर्च परीक्षण व व्यवस्थापन यांनी माहिती दिली.

आढावा बैठकीला बँक ऑफ इंडियाचे उप-विभागीय व्यवस्थापक विशाल सिंग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई,  प्रबंधक आर्थिक समावेश आणि विकास रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विशाल गोंडके, जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड आशुतोष जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी.एम. शिंदे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, अग्रणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक कुलभूषण उपाध्ये, महामंडळे व इतर शासकीय विभागाचे अधिकारी तसेच सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक यावेळी उपस्थित होते.

सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्रा अंतर्गत  सर्व बँकांनी वार्षिक उद्दिष्टाच्या 146 टक्के उद्दिष्ट पूर्तता डिसेंबर अखेरच पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व बँकांचे कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post