व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकार व कुटुंबियांसाठी आरोग्य शिबीर संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : येथे  व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी घेण्यात आलेल्या आयुष्यमान भारत कार्ड वाटप व आरोग्य शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये  इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ परिसरातील पत्रकार व कुटुंबीयांनी सहभाग घेतला.

पत्रकार व त्यांच्याच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडिया  कोल्हापूर जिल्हा शाखेमार्फत इचलकरंजी शहरात आयुष्यमान भारत कार्ड वाटप व आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले  होते. 

इचलकरंजीतील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र नाकोडानगर येथे  आयुष्यमान भारत  कार्डचे वाटप  करण्यात आले. आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड व आभा कार्डचे सुमारे 150 पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना वाटप करण्यात आले. यामध्ये कॉमन सर्व्हिस सेंटरचे जिल्हा समन्वयक सुशांत मोरे, दीपक अग्रवाल, मुकेशकुमार दायमा यांचे सहकार्य लाभले. तर  सेवासदन हेल्थ  प्लस  हॉस्पिटल येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.

सुरुवातीस हॉस्पिटलच्या व्यवस्थापिक गायत्री डुबल यांनी शिबीर संदर्भात मार्दर्शन केले.  व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेला सेवासदन हॉस्पिटलचे सदैव  सहकार्य लाभेल अशी ग्वाही दिली. व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाप्रवक्ते डॉ. दगडू माने यांनी, संघटनेची ध्येय-धोरणे व पत्रकारांना मिळणारे लाभ संदर्भात माहिती दिली. शहराध्यक्ष साईनाथ जाधव यांनी आभार मानले. आरोग्य शिबिरात शुगर, ब्लडप्रेशरसह वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. शिबीर यशस्वीतेसाठी डॉ. सोनाली चव्हाण, पल्लवी कांबळे, मेघा कांबळे, वर्ष वायदंडे, आरती कांबळे, अक्षता सुतार, रेखा पेडणेकर यांनी परिश्रम घेतले.

यावेळी व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या माध्यमातून पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी अनेक विविध उपक्रम राबवले जात असल्याचे सांगताना जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी भविष्यात वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले. शिबिरास शिरोळ तालुका अध्यक्ष संतोष तारळे, गणपती कोळी,  कुलदीप कुंभार,  इचलकरंजी शहर उपाध्यक्ष महेश आंबेकर, रविकिरण चौगुले, सरचिटणीस  बाळासाहेब पाटील, शितल पाटील, निखील भिसे, रोहन हेरलगे, विनायक खोत यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post