हातकंणगले येथील परिसरात महिलेचा खून.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर :  हातकंणगले/मजले -या परिसरात असलेल्या इंडस्ट्रीअलकडे जाणारयां मार्गावर दोन-तीन दिवसांपूर्वीच भाड्याने रहाण्यास आलेली रुपाली दादासो गावडे (रा.हिंगणगाव ता.हातकंणगले) हिचा दोरीने गळा आवळत खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे.

ही घटना घर मालक राजदिप खोत यांच्या मालकीच्या भाड्याने दिलेल्या खोलीत घडली असून ती आपल्या प्रियकरा सोबत रहाण्यास आली होती.पण तिचा प्रियकर घटना घडल्या पासून गायब झाला आहे.तिच्या गळ्या भोवती दोरीचे व्रण दिसून आले.ही घटना समजताच हातकंणगले पोलिस घटना स्थळी जाऊन पहाणी करून पंचनामा करून मयत रुपालीच्या मोबाईल वरुन संशयीताचा पोलिस शोध घेत आहेत.घटना स्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते.हातकण्ंगले पोलिस ठाण्याचे पो.हेड कॉ.महादेव खेडकर यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.खून झालेल्या रुपालीचे माहेर बागणी ता.वाळवा असून तिला दोन मुले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post