बंद अवस्थेतील लिफ्ट दुरुस्त करत अ सताना झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यु , गांधीनगर येथील दुर्घटना.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -करवीर तालुक्यातील गांधीनगर येथे बंद अवस्थेत असलेली लिफ्ट दुरुस्त करीत असताना झालेल्या दुर्घटनेत महेश जेम्स  कदम (वय 34 रा.राजारामपुरी 4 थी गल्ली) आणि किशोर बाळु गायकवाड (वय 63.रा.टोप ) यांचा लिफ्ट कोसळुन मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की,गांधीनगर परिसरात असलेल्या मसुटेमळा येथे रहात असलेल्या महेद्रसिंग  राजपुरोहित  यांची गेल्या काही महिन्या पासून लिफ्ट बंद अवस्थेत होती.ती चालू करण्यासाठी यांना दुरुस्तीचे काम दिले होते.बुधवार दि.08/05/24 रोजी लिफ्ट दुरुस्त करीत असताना अचानक कोसळुन झालेल्या दुर्घटनेत गंभीररित्या जखमी झाल्याने नातेवाईकांनी महेश कदम यांना  छोटा हत्ती टेंपोतून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.त्यांना पत्नी ,एक मुलगा आणि मुलगी आहे.किशोर गायकवाड यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचाही उपचारापूर्वी मृत्यु झाला.त्यांना पत्नी ,दोन मुली एक मुलगा आहे.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.गांधीनगर पोलिसांनी सीपीआर रुग्णालयात येऊन माहिती घेऊन दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करून रात्री उशिरा दोन्ही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post