काद्यांची पोती चोरून विक्री करण्यारयांस अटक .

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर -मार्केटयार्डातील हमालीचे काम करणारा संजय गणपती लोहार (रा.बांदिवडे) याला काद्यांची पोती चोरून विक्री प्रकरणी शाहुपुरी पोलिसांनी अटक करून त्याच्या इतर साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.

जय लोहार याने हमालीचे काम करीत असलेल्या होलसेल व्यापारी दुकानदार अनुप पोपटानी,बन्सीलाल आणि जानकर नावाच्या दुकानातुन काही काद्यांच्या पोत्याची चोरी झाली होती.या प्रकरणी या  दुकानदारांनी शाहुपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.त्या नुसार तपास करीत असताना हमालीचे काम करीत असलेल्या काही जणांकडे चौकशी करत असताना संशयीत संजय लोहार याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली.

या दुकानात ट्रक मधून आलेली कांद्याची पोती उतरत असताना त्यातील काही पोती चोरून दुसरयां दुकानात उतरुन परस्पर विक्री केल्याची कबुली दिली अ सता त्याच्या कडील 20 काद्याची पोती जप्त करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.पोलिस त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.ही कारवाई शाहुपुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फ़ोजदार संदिप जाधव यांच्यासह त्यांच्या टीमने केली .

Post a Comment

Previous Post Next Post