हेरले येथील मातंग समाज्याच्या तरुणावर झालेल्या खुनी हल्याच्या निषेधार्थ डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाला यश


प्रेस मीडिया लाईव्ह :

 प्रतिनिधी : संदीप कोले :

 कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हेर्ले हे गाव छ. शाहू महाराजांच्या पदस्पर्शने पुनीत झालेले गाव त्या गावामध्ये सर्व समाज गुण्यागोविंदाणे राहत असताना शाहीर भिकाजी कोळेकर,वैभव पोपट कोळेकर,आदित्य संजय परमाज,अविनाश भुज्जाप्पा कोळेकर,समीर हुसेन भैरूपे सर्व रा. हेर्ले या जातीयवादी गुंडानी मातंग समाज्याचा तरुण धीरज दीपक लोखंडे याला घरातून उचलून नेऊन मारहाण करून तो मेला म्हणून त्याला त्याच्या दारात आणून टाकून गेलेत 

सध्या तो मातंग समाज्याचा तरुण धीरज हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.असे असताना हातकणंगलेचे पोलीस मारहाण करणाऱ्या आरोपीना अट्टक करण्या ऐवजी धीरज लोखंडे यालाच चुकीच्या कलमाखाली अट्टक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. घडलेल्या घटनेची गांभीर्य पाहता आरोपींच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार व 307 कलमांतर्गत कारवाई होणे गरजेचे असताना हातकणंगले पोलीस स्टेशनची P.I यानी आपल्या कार्यकाळाचा शेवटचा टप्पा असल्याने आर्थिक संगणमताने आरोपीना पाठीशी घालणाचा प्रयत्न केल्याची शक्यता आहे.म्हणून संबंधित पोलीस अधिकाऱ्याची खातीनिहाय चौकशी करण्यात यावी व या अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा त्याप्रमाणे जातीयवादी गुंडाच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट व 307 कलमानुसार कडक कारवाई करण्यात यावी. त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा व जातीवादी गावंडांच्या निषेधार्थ  डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या मोर्चाला यश आले असे मत डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष सुकुमार कांबळे सर यांनी सांगितले  

त्यावेळी  या आक्रोश मोर्चाचे नेतृत्व  संस्थापक अध्यक्ष मा. प्रा. सुकुमारजी कांबळे यांनी केले .प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे ,हातकणंगले तालुका अध्यक्ष विकास अवघडे,जिल्हा सल्लागार,भिकाजी अवघडे,वडगाव शहराध्यक्ष सुरेश आवळे, जिल्हा उपाध्यक्ष राजू सुवासे,अर्जुन समुद्रे, .बाबासो गावडे, रोहित माटे, लीलाधर कांबळे, सुनील कांबळे , सुनिता इसापूरे, समस्त मातंग समाज, बौद्ध समाज,  वंचित बहुजन आघाडी शाखा हेरले च्या वतीने पाठिंबा देण्यात आला. त्यावेळी  महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post