विशेष वृत्त : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचा ताबा पुरातत्व विभागाकडे घेण्याची विनंती


प्रेस मीडिया लाईव्ह : 

फिरोज मुल्ला सर :

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील मुख्य इमारत हा ऐतिहासिक ठेवा आहे. या इमारतीचा पूर्णपणे ताबा पुरातत्त्व विभाग यांच्याकडे घेण्याची विनंती पुण्यातील एका नागरिकाने (नाव जाहीर न करण्याच्या अटीवर) केली आहे. गेल्यावर्षी घडलेल्या अनियमित रॅप सॉंग प्रकरणी  या इमारतीची विटंबना झाली आहे, तसेच तिच्या पावित्र्यास  कलंक लागला आहे. 

अशा आशयाचे पत्र अर्कॉलॉजी सर्वे ऑफ इंडिया, नवी दिल्ली, मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य आणि मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचनालय, मुंबई यांना पुण्यातील या नागरिकांने पाठविले आहे. या पत्राची प्रत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, प्र कुलगुरू, प्रभारी कुलसचिव, तसेच मा. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य, सहायक संचालक, अर्कॉलॉजी डिपार्टमेंट, येरवडा, पुणे, मा. कार्यकारी अभियंता, ऐतिहासिक वारसा व्यवस्थापन कक्ष, पुणे महानगरपालिका यांना देखील दिली  आहे. या विनंती अर्जासोबत रॅप सॉंग समितीचा चौकशी अहवाल देखील पाठविला आहे. 

या पत्रासोबत मा. राज्यपाल तथा कुलपती सचिवालयाचे कारवाई करण्यासंदर्भातील पत्र देखील जोडले आहे. रॅप सॉंग प्रकरणासोबतच मध्यंतरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या आतील बाजूस आग लागल्याचे प्रकरण देखील नमूद केले आहे. विद्यापीठात सर्व विषयांचे प्रशासकीय, सुरक्षा, तंत्रज्ञान विषयांचे तज्ञ व सीसीटीव्ही उपलब्ध असताना ही आग लागण्याचे कारण समजले नाही. हा विद्यापीठाचा हलगर्जीपणाचा आहे. 

सदर बाबींमध्ये विद्यापीठाच्या प्रशासनाचा व सुरक्षा व्यवस्थेचा अभाव जाणवतो. वरील प्रकरणाबाबत  पुण्यातील या नागरिकाने  आर्किऑलॉजी प्रोटेक्शन रिसोर्सेस ॲक्ट व पुराण वस्तू शास्त्रविषयक संरक्षण कायदा यामधील तरतुदीनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील या प्रकरणा संदर्भातील संबंधित प्रशासन व सुरक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post