प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील हणमंतवाडी येथे हवेत गोळीबार केल्या प्रकरणी करवीर पोलिसांनी हणमंतवाडीचा "माजी सरपंच "' संग्राम हिंदुराव भापकर यांचा हवेत गोळीबार करताना जुना व्हिडिओ बुधवारी (ता.३०) एका वृत्तवाहिनीने प्रसारित केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी माजी सरपंचाला चौकशीसाठी ताब्यात घेऊन सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, हणमंतवाडी येथील जय बजरंग दूध व्यावसायिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक शनिवारी (ता.२६) रोजी पार पडली. या निवडणुकीत गावचे माजी सरपंच संग्राम हिंदुराव भापकर यांच्या पॅनलने निर्विवाद विजय मिळवून सत्ता स्थापन केली. निवडणुकीनंतर गावातील वातावरण सुरळीत चालू असतानाच आज (ता.३०) एका वृत्तवाहिनीने अचानक हणमंतवाडीत उत्साहाने संग्राम हिंदुराव भापकर (वय ४२, रा. हणमंतवाडी, ता. करवीर) यांनी मिरवणुकीत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याची बातमी प्रसारित केली आणि महाराष्ट्रासह कोल्हापुर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
घटनास्थळी चौकशी केली असता संबंधित व्हिडीओ ११ ऑक्टोबर २०२१ ते १७ ऑक्टोबर २०२१ या कालावधीतील दसरा उत्सवाच्या वेळी सिमोलंघन क्षणी गावातील बिरदेव मंदिर वरील असल्याची माहिती मिळाली. काहीनी माजी सरपंच संग्राम भापकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अधिकृत डीबीबीएल १४४०२, १२ बोअर रायफल (परवाना क्र.९३७/२००८) हि परवाना नुतनीकरणासाठी करवीर पोलीस ठाणे मध्ये २२ जून २०२४ मध्ये जमा केली असून ती अद्याप परत आणली नसल्याचे सांगितले. त्यामुळे घटनेची पडताळणी न करता सबंधित वृत्तवाहिनीने व्हिडीओचे प्रेक्षेपण कोणत्या आधारे प्रसारित केले याची चौकशी केली जाईल असे विद्यमान यांनी बोलताना सांगितले तर, गावचे पोलीस पाटील यांनी गावकऱ्यांनी शहानिशा न करता कोणताही व्हिडीओ व्हायरल करू नये असे आवाहन केले.
सबंधित हवेत गोळीबाराची घटना जुनी असली तरी गावामध्ये शांतता भंग करण्याच्या उद्देशाने रायफल मधून हवेत दोन बार उडवून गावची शांतता भंग करणे, त्याच्या पुंगळ्या शासनाकडे जमा न करता इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करणे अशा गुन्ह्याखाली करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. घटनेचा अधिक तपास करवीर पोलिस करत आहेत.