लक्षतीर्थ परिसरात असलेल्या मदरशावर कोल्हापूर महानगरपालिकेची कारवाई करताना तणाव .

 नागरिकांनी विरोध करून महापालिकेस घेराव.

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर-आज कोल्हापुर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने लक्षतीर्थ परिसरात असलेल्या बेकायदेशीर बांधकाम पाडताना तेथील लोकांनी विरोध करून शाब्दीक चकमक आणि वादावादी झाली.तेथील लोक धार्मिक स्थळात बसले तर महिलांनी रस्त्यावरच ठाण मांडून बसले.यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


यावेळी पोलिसांनी बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता.त्यांनी संतप्त जमावाला शांततेचे आवाहन केले.मात्र जमावाने जो प्रर्यत कारवाई थांबत नाही तो प्रर्यत हलणार नाही अशी भूमिका घेतली.काही नागरिकांनी महापालिकेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले.बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची तयारी सुरू असताना तेथील नागरिक एकत्रितपणे येऊन विरोध करू लागले.आरडा ओरडा करु लागल्यामुळे जास्तच तणाव निर्माण झाला होता.पोलिसांनी उपस्थितांना शांततेचे आवाहन केले.या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,शहर पोलिस अधीक्षक अजित टिके .पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले होते.

---------------------------

या घटनेमुळे पोलिसांनी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

----------------------

याचे पडसाद दसरा चौकात.

अहमदनगर जिल्ह्यातील सोनवडे गावाची शैक्षणिक सहल कोल्हापुरात आली होती.यावेळी या मुलांना शहरात घडलेला प्रकार माहित नव्हता.ते शाळकरी असल्याने यातिल काही मुलांनी जय श्रीरामचा नारा दिला असता काही समाजकंटकानी एका परिवहन मंडळाच्या एसटीसह काही वाहनावर दगडफेक करण्यात आली.या वेळी पोलिसांनी लाठीमार करीत जमाव पांगविला .या वेळी सीपीआर चौकात असलेल्या फळ विक्रेत्यानी आपल्या गाड्या पटापट बंद केल्या.या वेळी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याचे समजते. .

----------

पोलिस प्रशासना कडुन शांततेचे आवाहन.

दसरा चौकात एसटी बसवर समाजकंटकानी केलेल्या दगडफेकीत एसटीसह अन्य वाहनाचे नुकसान केल्या प्रकरणी ज्या व्यक्तीने दगड मारला त्याला ताब्यात घेऊन पोलिस कारवाई         करीत आहेत.तरी नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post