संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळा अंतर्गत “पेपर प्रेझेंटेशन” स्पर्धेचे आयोजन



प्रेस मीडिया लाईव्ह :

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे

अतिग्रे : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई आयोजित दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ठीक १०.०० वा. संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे, जिल्हा कोल्हापूर येथे पेपर “प्रेझेंटेशन स्पर्धेचे” आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एमएसबीटीई सहसचिव मा. श्री शहीद उस्मानी हे उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून विविध तंत्रनिकेतन मधील  विद्यार्थी, प्राध्यापक आपल्या विविध कला कौशल्याने सादर केलेले “सस्टेनेबल इंजीनियरिंग टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट” या विषयावर पेपर प्रेजेंट  करणार आहेत.

या स्पर्धेचे आयोजन संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या  मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागांतर्गत केले असून    स्पर्धेचे प्रमुख समन्वयक, प्रा. प्रशांत एम. पाटील, सहसमन्वयक, प्रा. स्वप्निल जे.  ठिकणे व विभागातील सर्व प्राध्यापक ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील  विद्यार्थांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावे असे आव्हान संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. विराट गिरी यांनी केले आहे

या स्पर्धेचे आयोजनास संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष, श्री. संजयजी  घोडावत, विश्वस्त, विनायक  भोसले,  इन्स्टिट्यूट चे प्राचार्य  डॉ. विराट गिरी  यांनी  शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post