पुणे महानगरपालिकेत सर्वात मोठा सॅनिटरी नॅपकीन घोटाळा ; काँग्रेसचा आरोप


पुणे न्यूज एक्सप्रेस :

फिरोज मुल्ला सर : 

पुणे महानगरपालिकेत सर्वात मोठा सॅनिटरी नॅपकीन घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केल्याने जोरदार खळबळ उडाली आहे , पुणे महानगरपालिका हद्दीतील 38 हजार विद्यार्थीनीना गेली दोन वर्षे सॅनिटरी नॅपकिन मिळालेलेच नाहीत.भाजपा आमदार-खासदार यांच्या टेंडर मध्येच सॅनिटरी नॅपकिन अडकल्याचा  जोरदार आरोप करण्यात आला आहे. 

टेंडर देण्यावरून महानगरपालिकेत आमदार खासदार मध्येच भांडण सुरू आहे.टेंडर देण्यासाठी महापालिकेच्या आधिकाऱ्यांवर भाजप नेत्यांचा दबाव असल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे. 

या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कारवाई करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं आहे. तसेच याप्रकरणी वेळेवर नाही कारवाई झाली तर काँग्रेस, महानगरपालिकेत जाऊन तीव्र आंदोलन करणार असल्याचा,  इशाराही त्यांनी दिला आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post