कन्या महाविद्याललयात केक - प्रेस्टीज प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी: प्रतिनिधी : 

येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या गृह विज्ञान विभाग आणि रचना उद्योजिका प्रेरणा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी केक आणि पेस्ट्रीज प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थिनींना शालेय शिक्षणाबरोबरच आणि शैक्षणिक अभ्यासक्रमा शिवाय इतरही कलागुणांचे ज्ञान व्हावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील जवळजवळ 50 हून जास्त विद्यार्थ्यांनींनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला.तसेच वेगवेगळ्या प्रकारचे केक आणि प्रेस्टीसचे बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. भविष्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून या विद्यार्थिनींना या कार्यशाळेचा निश्चितच फायदा होईल, असे मत या कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शिका प्रशांती बडवे यांनी व्यक्त केले. तसेच रचना उद्योजिका प्रेरणा मंचच्या  शिल्पा गांजवे यादेखील यावेळी उपस्थित होत्या. 

महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी असे विविध कोर्सेस, प्रशिक्षण कार्यशाळा नेहमीच आयोजित केल्या जातात. या कार्यक्रमांना महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो.डॉ.त्रिशला कदम यांचे नेहमीच  मार्गदर्शन असते.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक गृह विज्ञान विभाग प्रमुख प्रा. संगीता पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन स्वाती हळवणकर यांनी केले.या कार्यक्रमाचे आभार  हेमलता देसाई यांनी मानले.या

महाविद्यालयातील सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी या कार्यशाळेसाठी मोठ्या उत्साहाने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post