दुचाकी चोरणारे व घरफोडी करणा-यांकडुन चोरीच्या एकुण १४ दुचाकी वाहने व घरफोडीतील सोने व रोख रक्कम असा एकुण ७ लाखांचा मुददेमाल केला आरोपींकडुन हस्तगत,एकुण १२ गुन्हे उघडकीस



प्रेस मीडिया लाईव्ह : 

 पुणे : मुंढवा पोलिस ठाणे यांचे आदेशाने मुंढवा पो.स्टे. गु.र.नं. ३०२ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ मधील चोरीस गेलेली स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. MH12FT357 या वाहनाचा व अज्ञात आरोपींचा शोध घेणेचे आदेश तपास पथक प्रमुख संदीप जोरे व स्टाफ यांना देण्यात आले होते. सदर आदेशावरुन तपास पथक हददीत गस्त करीत असताना तपास पथकातील अंमलदार पोहवा ४१०२ दिनेश भांदुर्गे व पोशी ८१४३ सचिन पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की दोन मुले संशयीत रित्या काहीतरी अपराध करण्याचे इराद्याने चोरीची दुचाकी घेवुन साज कंपनी जवळ घोरपडी गाव या ठिकाणी फिरत आहेत. सदरबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री विष्णु ताम्हाने यांना कळविल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिल्याने मुंढवा तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन

बातमीप्रमाणे संशयीत आरोपीस थांबवुन त्यांचे ताब्यातील मोटारसायकल बाबत त्यांनी खात्रीलायक माहीती न दिल्याने त्याबाबत संशय आला असता त्यांचे ताब्यातील वाहन हे मुंढवा पोलीस ठाणे गुर नं गु.र.नं. ३०२ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ मधील चोरीस गेलेली स्प्लेंडर प्लस ही गाडी चोरलेले निष्पन्न झाले. सदर वाहनावरील आरोपी व त्याचा साथिदार वीस बालक याचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांचेकडुन एकुण १४ दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झालेने ते जप्त करुन त्यांचेकडुन कोंढवा पोलीस ठाणे हददीतील घरफोडीतील सोने व रोख कॅश असा एकुण ७.लाखचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या विविध कंपन्यांच्या १४ दुचाकी गाड्यांपैकी ११ गाडयांबाबत पुणे शहर व परीसरातील पोलीस ठाणेत गुन्हे दाखल असुन इतर ३ जप्त वाहनांबाबत अधिक तपास सुरु आहे. वरील गुन्हे हा अटक आरोपी व त्याचा जोडीदार वी स बालक यांनी केले आहेत. गोरख विलास धांडे, वय-२० वर्षे, रा. शिवशंभो नगर, लेन नं.४, इस्कॉन मंदीर चौक, गोकूळ नगर, कात्रज, पुणे असे असुन त्याचेवर घरफोडीचे २ गुन्हे दाखल आहेत.अटक आरोपी व त्याचा साथिदार वी स बालक यांचेकडुन खालीलप्रमाणे चाहने जप्त करण्यात आलेली असुन सदरबाबत विविध पोलीस ठाणेस दाखल गुन्हे खालीलप्रमाणे आहेत. आणखी तीन दुचाकी बाबत चा तपास चालु आहे.

सदरची कामगीरी रीतेश कुमार पोलीस आयुक्त, संदिप कर्णीक सह पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग, विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५, अश्विनी राख, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर,यांचे मार्गदर्शनाखाली  विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रदिप काकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक संदिप जोरे, दिनेश राणे दिनेश भांदुर्गे, महेश पाठक, वैभव मोरे, राहुल मोरे सचिन पाटील व स्वप्नील रासकर यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post