अलिबाग जिल्हा रुग्णालयात आपत्ती व्यवस्थापन ८०जणांना प्रशिक्षण



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

 अलिबाग जिल्हा रुग्णालयातील व. शासकीय महाविद्यालयातील अधिकारी कर्मचारी. व शिकाऊ डॉक्टर आणि  परिचारिका.यांच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षाविषयक शिबिर मंगळवारी जिल्हा रुग्णालयात संपन्न झाले 

हे शिबिर नव्याने आलेले सिविल सर्जन. डॉक्टर नितीन देव माने यांच्या मान्यतेने उपजिल्हा शल्यचिकित्सक. डॉक्टर शितल जोशी घुगे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी रायगडचा युवक फाउंडेशनचे अध्यक्ष, प्राध्यापक जयपाल पाटील. आपत्ती व्यवस्थापन  तज्ञ. आरसीएफ थळ चे माजी उपमहाव्यवस्थापक. फायर श्रीपाद लेले.समुपदेशक कुमारी मानसी अनुया मधुकर देवळे डॉक्टर अजित बर्गे उपस्थित होते डॉक्टर शितल जोशी यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात त्या म्हणाल्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी शिकाऊ डॉक्टर परिचारिका. यांना नेहमीच्या जीवनात अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागते. यासाठी संपूर्ण देशभर प्रशिक्षण देणारे रायगड भूषण जयपाल पाटील यांना आमंत्रित करावे असे आदेश आमचे सिविल सर्जन डॉक्टर नितीन देवमाने सरांनी सांगितले. यावेळी सर्वांकडून संविधान वाचन जयपाल पाटील यांनी करून घेतले.

 त्यानंतर आर.सी.एफ.थळचे उपमहावस्थापक (फायर)व दीपक फर्टीलायझर चे महाव्यवस्थापक  श्रीपाद लेले यांनी सर्व विनाश करणारी आगी बद्दल घरामध्ये, रुग्णालयात लागली तर परिचारिका व डॉक्टर यांनी आपली सुरक्षा बरोबर रुग्णांची सुरक्षा कशी व कोणत्या प्रकारे करावयाची,आग विझवण्याची बॉटला  कसे वापरावे,आपली काळजी घ्यावी. हे महत्त्वाचे आहे. याची माहिती त्यांनी दिली.संपूर्ण भारत देशात 5000 पेक्षा अधिक घटस्फोट थांबविणाऱ्या व लव्ह जिहाद बाबतीत समाजात प्रबोधन करणाऱ्या नागावच्या कुमारी मानसी देवळे यांनी घटस्फोटाची आपत्ती जीवनात येते त्याला सामोरे जाऊन आनंदी जीवन कसे जगता येईल. हे सांगून लहान मुले. सर्वांना मानसिक त्रास याबाबतीत संस्कार काळाची गरज अशा बाबत माहिती दिली.

यावेळी जयपाल पाटील यांनी सांगितले की. महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांनी 112 क्रमांकाचा वापर कसा करावा याचाी माहिती त्यांनी दिली व प्रात्यक्षिक देताना 112 क्रमांकावर फोन करतात अलिबाग पोलीस ठाण्यातून बीट अंमलदार यांचे पाचारण झाले व यंत्रणा पोलिसांची कशी कार्य करते त्याची माहिती दिली त्याचवेळी रस्त्यावरून जाताना अपघात झाला  तर सर्वात प्रथम महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खाते व बीव्हीजी इंडिया लिमिटेड ची 108 क्रमांकाची रुग्णवाहिकेला फोन करावा. आणि अपघातग्रस्तांना मदत करावी असे सांगितले. यासाठी केंद्र सरकारचे रस्ता विभाग व महाराष्ट्र शासनाकडून रोख बक्षिसे मिळतात याची माहिती दिली, 

 यावेळी प्रात्यक्षिक देताना. 108 ला फोन लावताच. अलिबाग हुन पेण कडे जाणारी कारले खिंडी मध्ये पोहोचलेली पेणची 108 रुग्णवाहिका डॉक्टर अजित बर्गे,पायलट सोबत येऊन कार्यक्रम स्थळी पोहोचले. त्यांनी उपस्थितांना 108. रुग्णवाहिकेच्या कामाची माहिती दिली.

  यावेळी प्रजापिता ब्रह्मकुमारी अलिबाग केंद्राच्या उप प्रमुख अंजू दीदी  यांनी मनावर येणाऱ्या आपत्ती बाबत,कसे शांततेने जीवन जगायचे. आपले जीवन व कुटुंबीय यांना कामावरील कामाचा त्रास कधी होऊन देऊ नये. यासाठी मनाची शांती कायम ठेवावी.तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी जगभर शांतीचा संदेश कसा देते याची माहीती दिलीत्यांच्यासोबत केंद्रप्रमुख भारती दीदी उपस्थित होत्या. सर्व उपस्थितना राखी बांधून गोड खाऊ भेट दिला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या  परिचारिका ट्रेनिंग सेंटरच्या सहाय्यक  मेट्रनअमिता भोपी, जिल्हा रुग्णालयाच्या सहाय्यक मेट्रन,प्रभा तारी परिचारिका उषा बावरे आपत्ती सुरक्षा मित्र विकास रणपिसे,सुरेश खडपे यांनी कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली.

 सूत्रसंचालन प्रतिम भुणार यांनी केले. कार्यक्रमास 80जणांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post