इरसालवाडी नागरिकांना तात्पुरती राहण्यासाठी सोय




प्रेस मीडिया लाईव्ह : 

दिनेश महाडिक : 

महाराष्ट्र शासन महसूल विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड विभाग यांच्या मार्फत इरसालवाडी नागरिकांना तात्पुरती राहण्यासाठी सोय करण्यात आली  आहे.

   

.

   मुंबई पुणे जुन्या हायवे लगत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे सहकारी सरनोबत नेताजी पालकर यांचे जन्मस्थळ चौक हे गाव असून चौक गावापासून सहा किलोमीटर अंतरावरती इरसाळ गड आहे. या इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेले इरसालवाडी ही आदिवासी वाडी तेथे वास्तव्यात होती. या वाढीवरती 19/07/2023 रोजी रात्री 10.30 च्या सुमारात ईरसाळगडाचा वाडीकडचा माती व दगड असलेला मोठा भाग या इरसालवाडी वरती कोसळला या वाडीमध्ये 45 घरे होती त्यातील वीस ते पंचवीस घरे त्या मातीच्या ढिगाराखाली गाढली गेली.व इतर असलेली घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.स्थानिक स्वराज्य संस्था व एन डी आर एफ च्या जवान व ग्रामस्थांच्या सहकार्याने काही लोकांना बाहेर काढण्यात आले.काही लोक अजूनही मातीच्या ढिगाराखाली आहेत. एन डी आर एफ चे जवान अजूनही शर्तीचे प्रयत्न करत आहेत.

अत्यंत दुःखदायक घटना या इरसालवाडी गावावरती घडली. या इरसालवाडी गावातील काही बचावलेल्या नागरिकांचे दुःखात सहभागी होऊन व दुःख समजून घेऊन धीर दिला . व घडलेल्या घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यासाठी विधानपरिषदेचे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते तसेच शिवसेना नेते माननीय श्री अंबादास जी दानवे साहेब हे आपल्या सर्व शिवसैनिक कार्यकर्त्यां बरोबर घटनास्थळी जाऊन झालेल्या घटनेची पाहणी केली. व तेथे उपस्थित असलेल्या सर्व शासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून इरसालवाडीच्या नागरिकांना त्या मातीच्या ढिगारातून बाहेर कसं काढलं जाईल याची चर्चा केली.इरसाल वाडी हे गाव नानिवली या पायथ्याशी असलेल्या गावापासून चार किलोमीटर वर डोंगरावर आहे.कोणत्याही प्रकारचे वाहन या वाडी वरती पोहोचू शकत नाही कारण वाडीचा रस्ता हा निमुळता असून तेथे छोटीशी पायवाट आहे. व दोन्ही बाजूला मोठी खाडी आहे. म्हणून घडलेल्या घटनेच्या ठिकाणी एन डी आर एफ चे जवान व स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक नागरिक यांच्या मदतीने फावडे घम्याळ या उपकरणे यांच्या साह्यान माती काढण्याचे काम चालू आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख माजी. मुख्यमंत्री श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, माननीय आमदार श्री आदित्यजी ठाकरे साहेब, शिवसेना नेते माननीय आमदार श्री.भास्कर जी जाधव साहेब, माननीय आमदार अनिल परब साहेब, माननीय आमदार सुनील प्रभू साहेब, जिल्हा संपर्कप्रमुख श्री. बबन दादा पाटील, जिल्हाप्रमुख माजी आमदार श्री. मनोहर शेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख श्री. नितीन दादा सावंत, खालापूर तालुकाप्रमुख श्री.एकनाथजी पिंगळे, जिल्हा परिषद सदस्य श्री.मोतीरामजी ठोंबरे,माजी उपसभापती श्री .शामभाई साळवी, व सर्व आजी-माजी शिवसैनिक मदतीसाठी उपस्थित होते व या घटनेमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना तसेच या घटनेमध्ये बचावलेल्या नागरिकांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांचं सांत्वन केलं.

भयानक अशा घडलेल्या घटने मधून बचावलेले इरसलवाडी मधल्या नागरिकांना पुन्हा त्यांचं हक्काचे घर मिळावे म्हणून शासन प्रयत्नशील राहील. जोपर्यंत या घटनेमधून बचावलेल्या नागरिकांच पुनर्वसन होत नाही. तोपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने महसूल वनविभाग जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग यांच्या प्रयत्नाने इरसालवाडी येथील नागरिकांना जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत तात्पुरती निवासाची सोय सर्व उपयुक्त सोयीनुसार शासनामार्फत होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post