बालिकेवर लंैगिक अत्याचार करणाऱ्या चांदी कारागिरास चोप देऊन पोलीसांच्या ताब्यात दिले



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर :   बालिकेवर  लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम तरुणास नागरीकांनी  चांगलाच चोप देऊन लक्ष्मीपुरी पोलीसाच्या ताब्यात दिले. सदरचा प्रकार शहरातील एका पेठेत  घडला. शैलेंद्र सखाराम पाटील (वय ४४ रा. मुळ गाव मुरगूड ता. कागल, सध्या कोल्हापूर शहर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

  पिडीत बालिका व तिची आई शहरातील एका पेठेत भाडयाने राहतात. पती परगावी असल्याने दोघीच घरी होत्या. आई एका दुकानात काम करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवत होती. आई कामाला गेल्यावर शेजारी राहणारा नात्यातीलच शैलेंद्र पाटील हा त्यांच्या घरात यायचा. २ जून ते १६ जुलै, २०२३ या कालावधीत शैलेंद्रने चार वर्षे सात महिन्यांच्या बालिकेवर लैगिक अत्याचार केले.

 बालिकेने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर त्याला जाब विचारल्यावर आपण असे काहीच केलेले नाही, असे म्हणू लागला. बालिकेच्या आईने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर मुलीची सीपीआर रुग्णालयात वैदद्यकीय तपासणी केली. गल्लीतील महिला व तरुणांना हा प्रकार समजल्यावर महिलांनी संशयीत शैलेंद्र यास बेदम चोप देऊन पोलीसांच्या ताब्यात दिले.

   पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रुपाली पाटील यांनी संशयीसात अटक करून शनिवारी सकाळी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गंभीर प्रकाराबदद्दल शहरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post